Coronavirus : पुण्यात डॉक्‍टरांची पथके घरोघरी पोचणार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 April 2020

मध्यवर्ती भागात कोरोनाचे रुग्ण वाढणार नाहीत, यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न करीत आहोत. अत्यावश्‍यक सेवा सुरू असल्याने गैरसोय होणार नाही; पण घरीच राहून या काळात नागरिकांनीही सहकार्य करावे. 
- शेखर गायकवाड, आयुक्त, महापालिका

पुणे - पेठांसह काही भाग ‘सील’ केल्यानंतर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेने नव्याने पावले उचलली आहेत. या भागांतील रहिवाशांची तपासणी करून संशयितांच्या घशातील द्रव पदार्थाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाची लक्षणे आढळून येणाऱ्या व्यक्तींना महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी ३० डॉक्‍टरांची पथके घरोघरी जात आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खबरदारी म्हणून काही उपाय करण्यात येत आहेत. त्याअंतर्गंत जो भाग ‘सील’ करण्यात आला; तेथील प्रत्येक घरांतील नागरिकांची आरोग्य तपसाणी केली जाणार असून, विशेषत: ताप, थंडी, सर्दी, खोकला आढळून येणाऱ्या नागरिकांच्या घशातील द्रव पदार्थांचे नुमने प्रयोगशाळांत पाठविले जातील. दरम्यान, हे आजार बळावण्याची शक्‍यता असलेल्या व्यक्तींवर आवश्‍यक उपचारही सुरू करण्यात येतील. त्यासाठी नागरिकांना तपासणीसाठी स्वत: पुढे यावे, असे आवाहन महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctors team will reach door to door in Pune