coronavirus: अखेर डॉक्टरांना हॉटेलमध्ये राहण्याची मिळाली परवानगी 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 April 2020

कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांना पुणे स्टेशन परिसरातील सुमारे पाच हॉटेलमध्ये राहण्यास मालकांनी अखेर परवानगी दिली आहे.

पुणे - कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांना पुणे स्टेशन परिसरातील सुमारे पाच हॉटेलमध्ये राहण्यास मालकांनी अखेर परवानगी दिली आहे. त्यामुळे त्यांच्या राहण्याचा प्रश्न सुटला आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना बाधित आणि संशयित रुग्णांवर ससून रुग्णालयामध्ये ते उपचार करत आहेत. परंतु, त्यांना वेळेवर घरी जाता येत नाही. सध्या या परिसरातील सर्व हॉटेल ग्राहक नसल्यामुळे रिकामीच आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्यासाठी आयबी विश्रामगृहात आणि पुणे स्टेशन परिसरातील काही हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तहसील प्रशासनाने पुणे स्टेशन परिसरातील काही चांगल्या हॉटेलमध्ये डॉक्टरांची राहण्याची सोय करण्याचा निर्णय घेतला. तहसीलदार आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी येथील काही हॉटेलच्या मालकांना डॉक्टरांसाठी खोल्या देण्याची मागणी केली. परंतु, या तरांकित समजल्या जाणाऱ्या हॉटेलच्या मालकांनी चक्क नकार दिला. परंतु, या भागातील एका लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या विनंतीनंतर डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना चार-पाच हॉटेल मालकांनी उपलब्ध करून दिले आहे. 

आणखी वाचा - उद्धवजी लोकांचे जीव वाचवा आणि जगण्याची साधनंही

आयबी विश्रामगृहात कर्मचाऱ्यांची व्यवस्था 

वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी आयबी विश्रामगृहात सुविधा दिली. काही डॉक्टरांना राहण्यासाठी हॉटेल देण्यात आली आहेत. तसेच, उर्वरित काही डॉक्टरांसाठी हॉटेल देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: doctors who treat coronary infected patients are finally allowed to stay at the hotel