या लिंकवर क्लिक करु नका अन्यथा मोबाईल होईल हॅक....

मिलिंद संगई
Monday, 20 April 2020

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लोकांचा सोशल मिडीयाचा वापर वाढल्याचा फायदा सायबर चोरट्यांकडून घेतला जात आहे. दोन महिन्यांसाठी नेटफ्लिक्स प्रिमीयम फ्री डेटा मिळत असल्याची लिंक सध्या व्हॉटसअँपवर फिरत असून या मुळे मोबाईल हॅक होण्याची भीती असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी सांगितले. कोणीही या लिंकला क्लिक करु नये, अन्यथा फोन हॅक होण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखविली.

बारामती - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लोकांचा सोशल मिडीयाचा वापर वाढल्याचा फायदा सायबर चोरट्यांकडून घेतला जात आहे. दोन महिन्यांसाठी नेटफ्लिक्स प्रिमीयम फ्री डेटा मिळत असल्याची लिंक सध्या व्हॉटसअँपवर फिरत असून या मुळे मोबाईल हॅक होण्याची भीती असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी सांगितले. कोणीही या लिंकला क्लिक करु नये, अन्यथा फोन हॅक होण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखविली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या लिंकला जे क्लिक करतात त्या क्षणी मोबाईल हॅक होऊन ती लिंक आपोआप पुढे सेंड होत जाते. सदर लिंक डाऊनलोड  होताच आपल्या मोबाईल मध्ये इटसमायफ्लिक्ल हे अँप आपोआपच इन्स्टॉल होते व त्यातून ही लिंक आपोआपच पुढे पाठवली जात आहे. 

असे अँप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड झाले असल्यास ते तातडीने युनिइन्स्टॉल करावे, असा सल्लाही शिरगावकर यांनी दिला आहे. या द्वारे फसवणूकीची दाट शक्यता असून नागरिकांनी हा मेसेज येता क्षणीच डिलीट करावा व इतरांनाही त्या बाबत कल्पना द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dont click on this link otherwise the mobile will be hacked