जुनी सांगवीत डॉ.बाबासाहेबआंबेडकर यांची जयंती घरातूनच साजरी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 April 2020

जुनी सांगवी परिसरात लॉकडाऊन व प्रशासनाच्या सुचनांचे पालन करत अनेकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरीच साजरी करून महामानवास अभिवादन केले. घरीच सुशोभीकरण करून अनेकांनी बुद्धवंदना म्हणून बाबासाहेबांना अभिवादन केले. तर यावर्षी फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशनच्या वतीने लॉकडाऊनमुळे कंत्राटी सफाई कामगार, घरकामगार महिला कुटूंब, कष्टकरी मजूरांना पंधरा दिवस पुरेल ईतका जिवनावश्यक वस्तुंचा शिधा वाटप करण्यात आला.

कोरोना जुनी सांगवी - जुनी सांगवी परिसरात लॉकडाऊन व प्रशासनाच्या सुचनांचे पालन करत अनेकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरीच साजरी करून महामानवास अभिवादन केले. घरीच सुशोभीकरण करून अनेकांनी बुद्धवंदना म्हणून बाबासाहेबांना अभिवादन केले. तर यावर्षी फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशनच्या वतीने लॉकडाऊनमुळे कंत्राटी सफाई कामगार, घरकामगार महिला कुटूंब, कष्टकरी मजूरांना पंधरा दिवस पुरेल ईतका जिवनावश्यक वस्तुंचा शिधा वाटप करण्यात आला.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्थायी समिती सदस्य संतोष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोशल डिस्टनिंगच्या सुचनांचे पालन करत गरजूंना घरपोच शिधा वाटप करण्यात आले. यात तांदुळ, गहू, तेल, साबण, मास्क, सँनिटायझर देण्यात आले. यावर्षी जुनी सांगवी, पिंपळे गुरव, नवी सांगवी, औंध कँम्प यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या वतीने कांताभाऊ कांबळे यांच्या नियोजनातून गरजू कष्टक-यांना शिधा वाटप करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr babasaheb ambedkar birth anniversary celebrate in home