रुग्णांच्या ‘काळजीवाहू’ डॉ. स्वाती बढिये

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 April 2020

आम्‍हाला अवश्‍य कळवा...
कोरोनाविरोधातील लढाईत अनेक योद्धे आघाडीवर आहेत. त्‍यांची भूमिका वेगळी असली तरी ध्येय मात्र एकच आहे. अशा अापल्‍या ओळखीतील, पाहण्यातील योद्ध्यांची माहिती, छायाचित्रे, व्‍हिडिओ आमच्यापर्यंत अवश्‍य पोहचवा. आपला संपर्क क्रमांक द्यायला विसरू नका. 
आम्‍हाला इ-मेल करा. : editor@esakal.com

मला सात वर्षाची मुलगी रिशा आणि चार वर्षांचा मुलगा नील अशी दोन लहान मुले आहेत. पण पुणे शहरात कोरोना विषाणू संसर्गाचे वारे सुरु झाल्यापासून मला घरी कमी आणि रुग्णालयातच अधिक वेळ द्यावा लागत आहे. महापालिकेच्या बोपोडी येथील द्रोपदाबाई खेडेकर रुग्णालयाच्या अधिक्षक (इन्चार्ज) डॉ. स्वाती बढिये सांगत होत्या. त्या स्वत:च्या लहान मुलांपेक्षा कोरोना रुग्णांच्या अधिक काळजीवाहू बनल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुणे शहरात जसजसे कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढू  लागले आहे. तसतसे संशयित रुग्णांचे चाचणीद्वारे योग्य निदान करणे आणि निदान झालेल्या रुग्णांवर उपचार करणेही गरजेचे बनले आहे. यानुसार पुर्वी संशयित रुग्णासाठी निश्र्चित करण्यात आलेल्या संस्थात्मक विलगीकरण (इन्स्टिट्यूशनल क्वराटांइन हॉल) रुग्णालयांमध्येच आता प्रत्यक्ष उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. निदान आणि उपचाराच्या जोडीलाच संबंधित रुग्णालयातच कोवीड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. अशी दुहेरी सेवा असलेले हे बोपोडी येथील द्रोपदीबाई खेडेकर रुग्णालय आहे. 

सध्या रूग्णालयात विलगीकरणासाठी (आयसोलेशन) ५० खाटांची सुविधा उपलब्ध आहे. पण सध्या येथे ५१ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.  दैनंदिन तपासणी व उपचाराबरोबरच कोवीड केअर सेंटरमध्ये येणाऱ्या संशयित रुग्णांची तपासणी करावी लागते. डॉ. बढिये यांना रात्री उशिरापर्यंत रुग्णांवर उपचार करावे लागतात. त्यामुळे घरी जाईपर्यंत मुले झोपलेली असतात. सकाळी कधीकधी मुले झोपेतून उठण्याआधीच रुग्णालयात जावे लागते आहे. 

डॉ. बढिये मूळच्या मुंबईच्या आहेत. त्यांनी मुंबईतील सायन येथील लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसची पदवी घेतली आहे.  पती पुण्यातच आय. टी. कंपनीत कार्यरत आहेत.

कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी पती व सासू-सासरे यांचे सहकार्य आणि आई-वडिलांचा  पाठिंबा आहे. रुग्णालयातील सहकारी आणि कर्मचाऱ्यांचेही मोलाचे सहकार्य आहे. या सर्वांमुळेच रुग्णांना अधिक वेळ देता येत आहे.
- डॉ. स्वाती बढिये, अधीक्षक, बोपोडी रुग्णालय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr Swati Badhiye care to patient coronavirus