आहारात घ्या, 'क' जीवनसत्व असलेली फळे! वैद्यकीय तज्ज्ञांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 March 2020

'क' जीवनसत्त्व असलेली फळे खाणे हे प्रतिकारशक्ती वाढविण्याचे उत्तम साधन आहे. त्यासाठी किवी, संत्री, मोसंबी, आवळा, लिंबू यांचा समावेश आहारात करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला.

पुणे - 'क' जीवनसत्त्व असलेली फळे खाणे हे प्रतिकारशक्ती वाढविण्याचे उत्तम साधन आहे. त्यासाठी किवी, संत्री, मोसंबी, आवळा, लिंबू यांचा समावेश आहारात करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

''दर दीड ते दोन तासांनी कोमट पाणी पिण्याने घसा स्वच्छ होतो. त्यातून श्वसनमार्गातील संसर्गाला प्रतिबंध होतो. तसेच, श्वनसमार्गातील रोगजंतूंना प्रतिकार करणेही शक्य होते. याचबरोबर दिवसातून एकदा 'डी-3' जीवनसत्वाची गोळी घेतल्यास प्रतिकारशक्ती वाढेल,'' असे हिलिंग हँड क्लिनिकचे प्रोक्टोलॉजिस्ट डॉ. अश्विन पोरवाल यांनी सांगितले. 
''हळद हा प्रभावी गुणकारी घटक आहे. त्यामुळे कर्क्यूमिनच्या गोळ्या, म्हणजेच हळदीचा अर्क देखील प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करतो," असा सल्लाही त्यांनी दिला.

Fight With Coronavirus : पुणेकरांसाठी मोठी बातमी; गेल्या 48 तासांत कोरोनाचे रुग्ण...

"हे आवर्जून लक्षात ठेवा आपण किंवा आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीने दुर्लक्ष केल्यास त्याचे गंभीर परिणाम सर्वांवर होण्याचा धोका आहे. त्यातून कोरोना विषाणूंचा संसर्ग चालूच राहील. म्हणून हे प्रतिबंधात्मक उपाय करा," असे आवाहनही डॉ. पोरवाल यांनी केले. 

संसर्ग रोखण्यासाठी...
-    सामाजिक अंतर आणि स्वतःला इतरांपासून दूर ठेवणे हा कोरोनाचा उद्रेक नियंत्रणाचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. कामाच्या ठिकाणी मित्र किंवा सहकार्‍यांसह गटात बसू नका. त्यांच्याशी बोलताना 4 ते 6 फुटांचे अंतर ठेवा. 
-    साबणाने हात धुणे,  सॅनिटायझर  वापरणे, तोंडाला वारंवार स्पर्श करणे टाळणे, हे आपल्या शरीरात या विषाणूचा प्रतिबंध रोखण्यासाठी मूलभूत उपाय आहेत.

कोरोनाची लक्षणे
- सर्दी 
- खोकला 
- ताप 
 - डोकेदुखी 
- थकवा 
- धाप लागणे 
- शिंका येणे 
- नाक वाहणे
- घसा खवखवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eat foods that contain c vitamin fruits appeal to medical experts