esakal | पुण्यात किराणा दुकाने सुरू रहाणार; गर्दी न करण्याचे आवाहन 
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात किराणा दुकाने सुरू रहाणार; गर्दी न करण्याचे आवाहन 

शहरातील सर्व किराणा दुकाने सुरू रहाणार आहेत. तसेच नागरिकांच्या सोईसाठी घरपोच सेवा पुरविण्यासाठी दुकानदारांचे संपर्क क्रमांक सोशल मिडीयावरून व्हायरल करण्यात आले आहेत.

पुण्यात किराणा दुकाने सुरू रहाणार; गर्दी न करण्याचे आवाहन 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - गुलटेकडी येथील मार्केट यार्ड बंद राहणार असेल तरी शहरातील सर्व किराणा दुकाने सुरू रहाणार आहेत. तसेच नागरिकांच्या सोईसाठी घरपोच सेवा पुरविण्यासाठी दुकानदारांचे संपर्क क्रमांक सोशल मिडीयावरून व्हायरल करण्यात आले आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'कोरोना'च्या पाश्वभूमीवर गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड २५ ते ३१ जानेवारी दरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय व्यापार्यांना घेतला आहे. त्यामुळे शहरातील किराणा दुकाने चालू रहातील की नाही याबाबत संभ्रम होता. किराणा दुकाने बंद झाल्यास दुध पुरवठा ही विस्कळीत होण्याची शक्यता आहे. याच भितीने गेले दोन दिवस शहरातील किराणा दुकानांमध्ये नागरिकांनी गर्दी केली होती. मंगळवारी ही सकाळपासून दुकानात गर्दी होती, मात्र अनेक दुकानदारांनी ग्राहकांना 'सोशल डिस्टंन्स' ठेऊन दुकानात येण्याची सूचना केल्याने रांगेत थांबून किराणा भरला. 

हेही वाचा : पुणे विद्यापीठातील केंद्राला 'नॅशनल रिसोर्स सेंटर'चे नामांकन

मार्केट यार्ड बंद असले तरी पुढील काळात सर्व दुकाने सुरू रहाणार आहेत त्यामुळे ग्राहकांना गर्दी करू नये, तसेच दुकानदारांनी चढ्या दराने वस्तू विक्री केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे पुणे जिल्हा रिटेल व्यापारी महासंघाचे सचिन निवंगुणे यांनी सांगितले. 

होम डिलीव्हरीसाठी वाॅट्सअॅपवर यादी 
शहरात सुमारे लहान मोठे मिळून १५ हजार दुकाने आहेत, नागरिकांना बाहेर पडता येत नसल्याने प्रत्येक भागातील किराणा दुकानदारांचे संपर्क क्रमांक व नावांची यादी वाॅट्सअॅपवरून व्हायरल करण्यात आली आहे. तसेच भाजी विक्रेत्यांनीही घरपोच सेवेसाठी यंत्रणा उभारली आहे.

loading image
go to top