मोरया ढोल पथक व मोरया महिला प्रतिष्ठानने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोरगरिबांसाठी मोफत किराणा माल वाटप केला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

वडगाव मावळ येथील मोरया ढोल पथक व मोरया महिला प्रतिष्ठानने कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हातावर पोट असलेल्या गोरगरिबांसाठी मोफत किराणा माल वाटपाचा एक घास गरीब कष्टकरी कुटुंबासाठी हा उपक्रम सुरू केला आहे.

वडगाव मावळ - येथील मोरया ढोल पथक व मोरया महिला प्रतिष्ठानने कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हातावर पोट असलेल्या गोरगरिबांसाठी मोफत किराणा माल वाटपाचा एक घास गरीब कष्टकरी कुटुंबासाठी हा उपक्रम सुरू केला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमात  वडगाव शहरातील १०० गोरगरीब कुटुंबासाठी मोफत किराणा माल वाटपाचे नियोजन केले आहे.
कोरोनामुळे घरी बसणे ठीक आहे , परंतु रोज कामावर गेल्याशिवाय संध्याकाळी ज्यांची चूल पेटत नाही अशा लोकांवर  खूप मोठे संकट आले आहे.

घरी बसून परिवाराचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे व त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

प्रामुख्याने शहरातील अनेक चाळीत आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना हा प्रश्न भेडसावत आहे.

कोरोनाचा फैलाव जास्त प्रमाणावर होण्याआधी उपासमारीनेच त्यांचे कुटुंब उध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत त्यांच्यापुढे भाकरीपेक्षा दुसरं कोणतंही संकट मोठं नाही

मोरया ढोल पथक व मोरया महिला प्रतिष्ठानचे संस्थापक नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊनच अशा कुटूंबांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. शहरातील दानशूर लोकांनाही आवाहन केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: essential goods distribute by morya dhol pathak and morya women pratisthan