रोज खा आवळा आणि हंगामी फळे! 

डॉ. माधवी कुलकर्णी 
बुधवार, 25 मार्च 2020

रोज सकाळी उठल्यावर अनशापोटी एक ग्लास आवळ्याचा रस प्यावा, किंवा रोज एक आवळा (मोरावळा) खावा.

कोरोनाच्या साथीवर मात करण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवा असे वेगवेगळे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत. पण, म्हणजे काय करायचे, हा सर्वसामान्यांपुढचा प्रश्न आहे. प्रतिकारशक्ती एका दिवसात वाढवता येत नाही, त्यासाठी नीट प्रयत्न करायला हवेत. आहार, निद्रा व ब्रह्मचर्य याद्वारे आपली प्रतिकारशक्ती वाढवता येते. ब्रह्मचर्याबाबतीत संयम राखा एवढेच म्हणता येईल. आहार व निद्रा याबाबतीत मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनीच दिनचर्या पाळायला हवी. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काही टिप्स 
- रोज सकाळी उठल्यावर अनशापोटी एक ग्लास आवळ्याचा रस प्यावा, किंवा रोज एक आवळा (मोरावळा) खावा. 
- च्यवनप्राशमध्येही आवळा असल्याने ते खावे. 
- कलिंगड, द्राक्षे, खरबूज, संत्री-मोसंबी ही सध्या उपलब्ध असलेली हंगामी फळे खावीत. 
- आठ-दहा काळ्या मनुका रात्री पाण्यात भिजत घालून त्या सकाळी खाव्यात. 
- भूक लागल्यावर योग्य मात्रेत षडरसयुक्त आहार घ्यावा, दोन आहारांत पुरेसा वेळही असावा. 
- धान्य, विशेषतः मूग आहारात असावेत. 
- ताज्या भाज्या भरपूर खा. 
- पुरेसे पाणी प्या. 
- गाईचे दूध, तूप यांचा समावेश आहारात करावा. 
- ताजे व गरम अन्न सेवन करावे. जंक फूड टाळाच; पण आंबवलेले पदार्थ, रेफ्रिजरेटरमधील पदार्थही टाळावेत. 
- पुरेशी झोप घ्या. रात्रीच्या वेळी सहा-सात तास झोप हवी. रात्रीची जागरणे व दिवसाची झोप हानिकारक ठरते. 
- दिवसाची सुरुवात सकाळी लवकर व्यायामाने करा. 
- रोजच तेलाने मसाज करून (अभ्यंग करून) स्नान करा, त्याचा लाभ हाडे व स्नायू यांना होतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: everyday eat awala and seasonal fruits

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: