Corona Virus : पुण्यातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याचे रिपोर्ट निगेटिव्ह; पुणेकरांना दिलासा!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

सध्या सगळीकडील कोरोनामुळे सगळीकडे दहशत निर्माण झालेली आहे. अशातच कोरोनाबाधित रुग्ण पुर्णपणे बरा होऊ शकतो हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. त्यामुळे सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. पुण्यातील पहिल्या दोन कोरोना बाधित रुग्णांची १४ दिवसांनतंर पुन्हा घेतलेली टेस्ट निगेटिव्ह आली आहे. उद्या पुन्हा एकदा त्यांचे सॅम्पल्स  टेस्टींगसाठी पाठवले जाणार आहेत. उद्या ते रिपोर्ट निगेटिव्ह आले की, त्यांना घरी सोडणार आहे.
 
पुणे : कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना सर्वाना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. पुण्यात पहिले कोरोना बाधित पती पत्नीचे रिपोर्ट आता निगेटिव्ह आले आहे. उद्या पुन्हा सॅम्पल टेस्टिंग एनआयव्हीकडे पाठविले जातील. ते रिपोर्ट पुन्हा निगेटिव्ह आल्यास दोघांना डिचार्ज  देऊन घरी सोडले जाणार आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या सगळीकडील कोरोनामुळे सगळीकडे दहशत निर्माण झालेली आहे. अशातच कोरोनाबाधित रुग्ण पुर्णपणे बरा होऊ शकतो हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. त्यामुळे सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. पुण्यातील पहिल्या दोन कोरोना बाधित रुग्णांची १४ दिवसांनतंर पुन्हा घेतलेली टेस्ट निगेटिव्ह आली आहे. उद्या पुन्हा एकदा त्यांचे सॅम्पल्स  टेस्टींगसाठी पाठवले जाणार आहेत. उद्या ते रिपोर्ट निगेटिव्ह आले की, त्यांना घरी सोडणार आहे.

Coronavirus : कोरोना व्हायरसची लक्षणे दिसताहेत? घाबरू नका पण...

पुण्यातील कोरोना बाधित ठरलेले हे दाम्पत्य पहिले रुग्ण. नऊ मार्चला हे दोघे पतीपत्नीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. या दाम्पत्यासोबत त्यांची मुलीला देखील कोरोनाची लागण झाली होती. हे लोक ज्या कॅबने पुण्याला आले त्या कॅब चालकाली कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. आता या पतीपत्नीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून त्यांच्यामुलीवर अद्याप  उपचार  सुरु आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: First Corona Virus Inflected Couple Test report Negative in pune