esakal | Coronavirus : कोरोना व्हायरसची लक्षणे दिसताहेत? घाबरू नका पण...
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus : कोरोना व्हायरसची लक्षणे दिसताहेत? घाबरू नका पण...

फ्ल्यूसारखी लक्षणे दिसल्यास...

- फोन करून अधिक माहिती घ्या

Coronavirus : कोरोना व्हायरसची लक्षणे दिसताहेत? घाबरू नका पण...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

पुणे : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. या व्हायरसचा फटका 177 पेक्षा जास्त देशांना बसला आहे. तसेच कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. आत्तापर्यंत जगभरात काही लाखांहून अधिक रुग्णांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे अनेकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पण याची लक्षणे दिसल्यास घाबरण्याची गरज नाही. पण आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

फ्ल्यूसारखी लक्षणे दिसल्यास...

फ्लूसारखी लक्षणे आढळल्यास करायचे काय हा मोठा प्रश्न सध्या अनेकांना पडत असेल पण त्यापूर्वी आपण आपल्या डॉक्टरांना फोन करून याची माहिती देऊ शकता आणि डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

गरज असेल तर रुग्णालयात जा

फ्लूसारखी लक्षणे दिसत असतील तर जास्त घाबरून जाण्याची गरज नाही. थेट रुग्णालयात जाऊ नका तर काही शंका असेल तर थेट डॉक्टरांना भेटण्यासाठी जाऊ नका. आधी त्यांच्याशी फोनवर बोला आणि सविस्तर माहिती घ्या. गरज असेल तरच रुग्णालयात जावे. 

फोन करून अधिक माहिती घ्या

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी सरकारी यंत्रणांकडून काही हेल्पलाईनही सुरु केली आहे. त्यावर संपर्क साधून माहिती घेऊ शकता.

सूचनांचे पालन करा

सर्दी, खोकला किंवा ताप असेल तर सरकारने जारी केलेल्या फोन नंबरवर फोन करून तुम्हाला काय होत आहे याची माहिती द्या. त्यानंतर ते देतील त्या सूचनांचं पालन करा. 

(वरील सर्व माहिती न्यूयॉर्क टाइम्सच्या गाईडलाईन्सनुसार)

loading image
go to top