coronavirus: पिंपरीत चिमुकलीसह चौघे पाॅझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 April 2020

चार वर्षांच्या चिमुकलीसह दोन महिला व एका पुरुषाचा अहवाल बुधवारी पाॅझिटिव्ह आला. त्यामुळे पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या 47 झाली आहे. चिमुकलीसह दोन्ही महिला हाय रिस्क काॅन्टॅक्टमधील आहेत.

पिंपरी - चार वर्षांच्या चिमुकलीसह दोन महिला व एका पुरुषाचा अहवाल बुधवारी पाॅझिटिव्ह आला. त्यामुळे पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या 47 झाली आहे. चिमुकलीसह दोन्ही महिला हाय रिस्क काॅन्टॅक्टमधील आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या आठ दिवसांत शहरात तब्बल 27 नवीन रुग्णांची भर पडली आहे. आतापर्यंत 12 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दरम्यान, बुधवारी सकाळी एका पुरुषाचा अहवाल पाॅझिटिव्ह आला होता. दिवसभरात घेतलेल्या नमुन्यांपैकी 75 जणांचा अहवाल प्रलंबित होता. त्यातील तीन अहवाल रात्री उशिरा पाॅझिटीव्ह आलेत. त्यात चिमुकलीचा समावेश होता. 

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

संभाजीनगर, गव्हाणेवस्ती 'सील' 
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने बुधवारी मध्यरात्रीपासून संभाजीनगर- चिंचवड आणि भोसरीतील गव्हाणेवस्ती व दिघी रस्ता सील केला.
कोरोना संसर्ग झालेल्या रुग्ण संख्येत दररोज भर पडत आहे. त्याला नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन कठोर उपाययोजना करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून यापूर्वी खराळवाडी, थेरगाव गावठाण, पडवळनगर, दिघी, घरकुल चिखली, भोसरी गावठाण, दापोडी, कासारवाडी यापूर्वी सील केले होते. आता त्यांची हद्द वाढविण्यात आली असून संभाजीनगर, गव्हाणेवस्ती, दिघी रस्ता हे भागही सील केले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four corona positives with a baby girl in pimpri