Coronavirus : घोरपडीत कोरोना रुग्ण सापडल्याने गावठाण सील 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 April 2020

घोरपडी गावातील एका महिलेला (वय ७५) कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे संपूर्ण गावठाण सील करण्यात आले आहे. तसेच परिसरात निर्जंतुकीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 

या महिलेला न्युमोनिया झाल्यामुळे तीन दिवसापूर्वी ससून रुग्णालयात दाखल केले होते. कोरोनाची चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल आज सकारात्मक आला आहे.

घोरपडी - गावातील एका महिलेला (वय ७५) कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे संपूर्ण गावठाण सील करण्यात आले आहे. तसेच परिसरात निर्जंतुकीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या महिलेला न्युमोनिया झाल्यामुळे तीन दिवसापूर्वी ससून रुग्णालयात दाखल केले होते. कोरोनाची चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल आज सकारात्मक आला आहे. त्यानंतर पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने सर्व परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात येत असून तिच्या कुटुंबीयांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच तिच्या घरी काम करणाऱ्या महिलेला होम क्वारंटाईन केले आहे.

ही महिला आजारी असल्याने अनेक महिन्यांपासून घरात बेड वर होती. तसेच तिने कोणताही प्रवास केलेला नाही. तरीही कोरोनाचा संसर्ग कसा झाला असा प्रश्न निर्माण झाला आहे. अगदी दाट वस्ती महिलेचे घर असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

घोरपडी गावठाण, विकासनगर ,बालाजीनगर, फिलिप चाळ , मरिमाता नगर आणि घोरपडी रेल्वे फाटक ते घोरपडी व्हिलेज हायस्कूल पर्यंतचे मेडिकल सोडून इतर सर्व दुकाने बंद करण्यात आले आहे.  नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये तसेच आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. असे पोलिसांनी सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ghorpadi seal by coronavirus patient are found