Video : पिंपरी : विद्यार्थ्याकडून बक्षिसाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 April 2020

कोरोना आजाराला रोखण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. अनेकजण आपापल्या परीने यासाठी योगदान देत आहेत. असे असताना काळेवाडी येथील यशराज नढे या विद्यार्थ्यानेही त्यासाठी पुढाकार घेतला असून त्याला दहावीच्या बक्षिसाची मिळालेली मिळालेली दहा हजार रुपयांची रक्कम कोरोनाला रोखण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत म्हणून बुधवारी दिली आहे.

पिंपरी - कोरोना आजाराला रोखण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. अनेकजण आपापल्या परीने यासाठी योगदान देत आहेत. असे असताना काळेवाडी येथील यशराज नढे या विद्यार्थ्यानेही त्यासाठी पुढाकार घेतला असून त्याला दहावीच्या बक्षिसाची मिळालेली मिळालेली दहा हजार रुपयांची रक्कम कोरोनाला रोखण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत म्हणून बुधवारी दिली.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेच्या वतीने दरवर्षी दहावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान केला जातो. त्याअंतर्गत यशराज याचाही दहा हजार रुपये देऊन सन्मान करण्यात आला होता. सध्या कोरोनाने देशात व राज्यात धुमाकूळ घातला आहे.

या आजाराचा राज्य सरकार सामना करत आहे. त्यासाठी हातभार म्हणून यशराज याने त्याला मिळालेली बक्षिसाची संपूर्ण रक्कम बॅंक खात्याद्वारे मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या बॅंक खात्यात वर्ग केली आहे. यशराज सध्या पिंपरी येथील जयहिंद महाविद्यालयात अकरावीत शास्त्र शाखेत शिकत आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्याद्वारे त्याने समाजापुढे एक आदर्श घालून दिला आहे. यासंदर्भात यशराज याने सांगितले, 'दूरचित्रवाणी वाहिन्यांवर कोरोनांसंदर्भातील बातम्या रोज बघतो. विज्ञान शाखेत शिक्षण घेत असल्यामुळे याचे गांभीर्य अधिक जाणवले. भविष्यात वैद्यकीय शिक्षण शाखेला प्रवेश घेऊन पुढे देशसेवा करायची आहे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gift amount from the student to the CM Assistance Fund