esakal | पुणे विद्यापीठातील केंद्राला 'नॅशनल रिसोर्स सेंटर'चे नामांकन
sakal

बोलून बातमी शोधा

Savitribai phule pune university

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने पाच वर्षांपूर्वी ‘पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन फॉर टीचर्स अँड टीचिंग’ हा उपक्रम जाहीर केला. त्याअंतर्गत देशातील विविध २० ठिकाणी ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट सेंटर’ (एफडीसी) जाहीर करण्यात आली. त्यापैकी एक केंद्र २०१८ साली पुणे विद्यापीठामध्ये सुरू करण्यात आले.

पुणे विद्यापीठातील केंद्राला 'नॅशनल रिसोर्स सेंटर'चे नामांकन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयांतर्गत सुरू असलेल्या ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट सेंटर’ने (एफडीसी) गेल्या दोन वर्षांत तब्बल तीन हजार प्राध्यापकांना प्रत्यक्ष तर तर १० हजार पेक्षा प्राध्यापकांना ऑनलाईन धडे देऊन त्यांचे कौशल्य विकासीत केले आहेत. 

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने पाच वर्षांपूर्वी ‘पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन फॉर टीचर्स अँड टीचिंग’ हा उपक्रम जाहीर केला. त्याअंतर्गत देशातील विविध २० ठिकाणी ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट सेंटर’ (एफडीसी) जाहीर करण्यात आली. त्यापैकी एक केंद्र २०१८ साली पुणे विद्यापीठामध्ये सुरू करण्यात आले. आता या केंद्राला दोन वर्षे पूर्ण झाली असून या काळातील केंद्राच्या कामगिरीचा लेखाजोखा केंद्राचे संचालक प्रा. संजीव सोनावणे आणि समन्वयक डॉ. सचिन सुर्वे यांनी सादर केला. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

या केंद्राने सलग ७८ कोर्सेस आयोजित केले होते. त्यात प्रत्यक्ष २ हजार ९६७ शिक्षकांनी सहभाग घेतला. या केंद्राच्या उत्तम कामगिरी मुळे गेले दोन्ही वर्ष पहिल्या वर्षी ऑनलाईन प्रशिक्षणासाठी ‘नॅशनल रीसोर्स सेंटर’ म्हणून नामांकन देण्यात आले आहे. 'लिडरशीप अँड गव्हर्नन्स इन हायर एज्युकेशन' आणि 'टिचिंग अँड टीचर्स इन हायर एज्युकेशन' या कोर्सेसचा समावेश आहे. केंद्रात ऑनलाईन प्रशिक्षणाद्वारे दोन वर्षांमध्ये तब्बल १०,०७३ इतक्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले, असे सोनवणे यांनी सांगितले. 

Corona Virus : पुण्यातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याचे रिपोर्ट निगेटिव्ह; पुणेकरांना दिलासा!

शिक्षकांच्या गरजा पाहून कार्यक्रम
या केंद्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात शिक्षकांच्या गरजा लक्षात घेऊन विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे ते शिक्षकांसाठी अधिक उपयुक्त ठरत आहेत. देशभरातील प्राध्यापक  पुणे विद्यापीठातील या केंद्रात प्रशिक्षण घेण्यास प्राधान्य देतात. 

प्रशिक्षणाची निष्पत्ती
- प्राध्यापकांच्या शिकवण्याच्या पद्धतीत सुधारणा. 
- विद्यार्थ्यांशी संवाद वाढवण्यात उपयुक्त
-शिक्षकांच्या वैयक्तिक विकासाच्या दृष्टीने उपक्रम फायद्याचे ठरले.
विद्यापीठातील केंद्रातील सुविधा
- सर्व आधुनिक सुविधांनी युक्त अशी इमारत 
- पाच लेक्चर हॉल, एक ग्रंथालय
-कॉन्फरन्स हॉल, कम्प्युटर लॅब, लँग्वेज लॅब.
-आधुनिक सोयींनी युक्त स्टुडिओ.
-आवारात शैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्र (इ.एम.एम.आर.सी.)
-प्रशिक्षणार्थींसाठी ११० क्षमतेचे स्वतंत्र वसतीगृह

loading image
go to top