कोरोना टाळायला मदत करणार जादुई घड्याळ, 13 वर्षाच्या हर्षचा शोध

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 April 2020

हर्ष चौधरी या विद्यार्थ्याने घड्याळासारखे संयंत्र तयार केले आहे. की जे चेहऱ्या जवळ हात जाताच इशारा देते.हर्षने पालकांच्या मदतीने वैज्ञानिक प्रयोग करणाऱ्या "सिग्मा 7 इंडस्ट्रीज' या प्रयोगशाळेची स्थापना केली आहे.

पुणे - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी चेहऱ्याला होणारा स्पर्श टाळण्याचे मार्गदर्शक तत्त्वे जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. परंतु, रोजच्या सवयीमुळे काहीना काही कारणाने आपला हात चेहऱ्याला लागतोच. यावर उपाय म्हणून तेरा वर्षाच्या हर्ष चौधरी या नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने घड्याळासारखे संयंत्र तयार केले आहे. की जे चेहऱ्या जवळ हात जाताच इशारा देते. विरार येथील नॅशनल इंग्लिश हायस्कूलचा विद्यार्थी असलेल्या हर्षने पालकांच्या मदतीने वैज्ञानिक प्रयोग करणाऱ्या "सिग्मा 7 इंडस्ट्रीज' या प्रयोगशाळेची स्थापना केली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

असे आहे संयंत्र 
- घड्याळाच्या आकाराचे हे संयंत्र हाताला लावता येते 
- गायरोस्कोपीक सेंसरमुळे हात चेहऱ्याकडे वळाल्यास इशारा देते 
- हस्तांदोलन टाळण्यासाठीचा इशारा सुद्धा देते 
- प्रयोगशाळेतील किंम्मत 90 रुपये मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्यास हीच किंमत 50 रुपयापर्यंत येईल 
- वॉटर प्रूफ असेलेल हे संयंत्र पाण्यातही वापरता येते. 

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

चेहऱ्याला स्पर्श का टाळावा? 
- विषाणू संसर्गाचे मोठे माध्यम असलेल्या हाताचा अनेकदा चेहऱ्याला स्पर्श होतो. 
- मास्क घालतानाही अनेकदा चेहऱ्याला स्पर्श होतो 
- चेहऱ्याची त्वचा, डोळे, नाक, कान आदी संवेदनशील असते 
- अशा संवेदनशील भागातून जिवाणूंचा संसर्ग होण्याची शक्‍यता अधिक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Harsh search of a magical clock that will help Corona