हृदयविकाराचा त्रास असणाऱ्यांनी काय करावे? 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 April 2020

कोरोनाचे निदान झालेल्या बहुतेक लोकांमध्ये सौम्य लक्षणे असतात आणि तो संपूर्णपणे बरा होतो. या विषाणूचे मुख्य लक्ष्य फुफ्फुस आहे. परंतु त्याचा परिणाम हृदयावर होऊ शकतो.

कोरोनाचे निदान झालेल्या बहुतेक लोकांमध्ये सौम्य लक्षणे असतात आणि तो संपूर्णपणे बरा होतो. या विषाणूचे मुख्य लक्ष्य फुफ्फुस आहे. परंतु त्याचा परिणाम हृदयावर होऊ शकतो. हृदयाचे आणि रक्ताभिसरणजन्य आजार असलेल्या लोकांना अधिक गंभीर आजाराचा धोका संभवतो. यामुळे त्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी ? 
- हृदयविकार 
- उच्च रक्तदाब 
- अँजियोप्लास्टी, बायपास सर्जरी, हार्ट ट्रान्सप्लांट झालेले नागरिक 
- इंजेक्‍शन फ्रॅक्‍शन कमी असणे, डायलेटेड कार्डियोमायोपाथी 

डॉक्‍टरांशी त्वरित संपर्क साधा 

चीन, युरोपातून मिळालेल्या माहितीनुसार ज्यांचे वय 70 पेक्षा जास्त आहे आणि ज्यांना हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि मधुमेह असेल तर त्यांना कोरोनाचा संसर्ग जास्त तीव्रतेने होतो. त्यामुळे अशा व्यक्तींनी जास्त काळजी घेणे आवश्‍यक आहे. कोरोनामुळे साधारणपणे फुफ्फुसाला हानी पोहोचते. पण काही वेळी हृदयाच्या पेशींना आणि त्याच्यावरच्या आवरणालाही सूज येऊ शकते. याला मायोकार्डायटिस आणि पेरीकरडायटिस असे म्हणतात. हे एक अत्यंत गंभीर गुंतागुंत आहे. काही जणांना कोरोनरी रक्तवाहिन्यांत रक्ताची गुठळी होऊन हृदयविकाराचा झटका येण्याचीही शक्‍यता असते. जर आपणास कोरोनाच्या लक्षणांबरोबर जास्त प्रमाणात दम लागणे, छातीत दुखणे अशी लक्षणे दिसल्यास डॉक्‍टरांशी त्वरित संपर्क साधावा. 

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

हृदयविकाराचा त्रास असणाऱ्यांनी काय करावे? 
- एखाद्या व्यक्तीला विषाणूची लागण झाल्यास दुसऱ्या व्यक्तीपासून 6 फुटांच्या आत हा विषाणू खोकला, स्पर्श अथवा शिंकेद्वारे पसरतो. त्यामुळे आजारी असलेल्या लोकांना टाळा. 
- किमान 20 सेकंद साबण आणि पाण्याने हात चांगले धुवा 
- खोकला आल्यास आपले तोंड आणि नाक झाकून घ्या. हात अवघड असेल तर कोपराच्या आतील भागाचा वापर करू शकता. 
- डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करू नका. 
- दरवाजे, हॅंडल्स, स्टीयरिंग व्हील्स किंवा इतर वारंवार स्पर्श केल्या जाणाऱ्या वस्तूंना स्वच्छ ठेवून निर्जंतुकीकरण करा. 

औषधाचे डोस बदलले पाहिजेत का ? 

आपण आपली हृदयविकाराची औषधे थांबविणे किंवा बदलणे खूप धोकादायक आहे आणि तसे केल्यास आपली परिस्थिती आणखी बिघडू शकते. हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक वगैरे रोखण्यासाठी उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी ही औषधे खूप प्रभावी आहेत. आपल्या उपचारांमधील कोणतेही बदल ज्याची शिफारस आपल्या डॉक्‍टरांनी केलेले नसेल तर ती आपल्याला हृदयाच्या स्थितीला हानिकारक होऊ शकते. रक्तदाब कमी करण्याची औषधे न बदलता घ्यावीत. कोलेस्टेरॉल कमी करण्याची स्टॅटिन नावाची औषधे चालू ठेवावीत. ती बंद करू नयेत . कोरोनाव्हायरससाठी अद्याप कोणतीही लस नसली तरीही, हृदयारोग असलेल्या रुग्णांनी न्युमोनिया आणि फ्लूसारख्या लसी घेणे आवश्‍यक आहे. 

कृपया आपल्या सर्व औषधे लिहून दिल्याप्रमाणे घ्या. शंका असल्यास आपल्या डॉक्‍टरांशी किंवा नर्सशी संपर्क साधा पण त्यांच्याशी बोलण्यापूर्वी कोणतेही बदल करु नका. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heart attack patient take care from corona