Coronavirus : ...साहेब तो 'होम क्वारंटाइन', तरीही फिरतोय रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 मार्च 2020

'साहेब, परदेशांतून आलेला नागरिक रस्त्यावरून मास्क न लावताच फिरत आहेत. काय करू?', "त्याला "होमक्वारंटाइन' केले आहे, तरीही तो घराबाहेर फिरतोय'', 'अमुक व्यक्‍ती फ्रान्समधून आली आहे, त्याची कोणाकडे तक्रार करू,' असे दिवसभरात शंभर "कॉल' आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याला येत आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांची एकद धांदल उडत आहेत. त्यातही आता सोसायटीधारक, नागरीक स्वत:हून कोरोनाबाबतच्या तक्रारी करत असल्याने कॉलची संख्या वाढली आहे.

पिंपरी - 'साहेब, परदेशांतून आलेला नागरिक रस्त्यावरून मास्क न लावताच फिरत आहेत. काय करू?', "त्याला "होमक्वारंटाइन' केले आहे, तरीही तो घराबाहेर फिरतोय'', 'अमुक व्यक्‍ती फ्रान्समधून आली आहे, त्याची कोणाकडे तक्रार करू,' असे दिवसभरात शंभर "कॉल' आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याला येत आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांची धांदल उडत आहेत. त्यातही आता सोसायटीधारक, नागरीक स्वत:हून कोरोनाबाबतच्या तक्रारी करत असल्याने कॉलची संख्या वाढली आहे.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव शहरात वाढत असल्याने काय करावे आणि करू नये याबाबत अनेकांमध्ये प्रचंड संभ्रम आहे. अशावेळी महापालिकेच्या "हेल्पलाइन' क्रमांकांवर, "सारथी'वर आणि आरोग्य वैद्यकिय अधिकारी यांच्या वैयक्तिक भ्रमणध्वनी क्रमांकावर सजग नागरीक "कॉल' करून माहिती देत आहेत. त्यामुळे आरोग्य नियंत्रण कक्षाकडे येणाऱ्या फोनची संख्या वाढली असून यामध्ये कोरोना संदर्भातील तक्रारींची संख्या अधिक आहे. परदेशांतून आलेले नागरिक रस्त्यावर फिरताना दिसले की, सर्वसामान्य नागरिक लगेच फोन करून आरोग्य अधिकाऱ्यांना कळवत आहेत. "बाजूच्या इमारतीमध्ये राहणारे एक कुटुंब परदेशातून आले आहे, वैद्यकीय तपासणी केलीय की नाही माहित नाही. काय करावे?', अशी विचारणा करणारेही फोन येत आहेत.

पिंपरी-चिंचवड : खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या 31 मार्चपर्यंत बंद राहणार

स्टॅंम्प धुऊन बाजारात फिरतोय
एक नागरीक नुकताच फ्रान्समधून आला आहे. त्याच्या हातावर स्टॅम्प मारून त्याला 14 दिवस घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. असे असतानाही संबंधित व्यक्ती हातावरील स्टॅम्प धुवून मार्केटमध्ये फिरत आहे, अशी तक्रार एका महिलेने आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली. या तक्रारीची दखल घेत डॉ. अनिल रॉय यांनी संबंधितांच्या घराची टेहाळणी केली, त्या व्यक्तीला शोधण्याचे प्रयत्न तात्काळ सुरु केले. तेव्हा तो पत्नीसह बाहेर फिरायला गेल्याचे समजले. त्याला पकडण्यासाठी त्याच्या घरी पोलिसांना पाठवले असून इतरांनी बाधित होऊ नये, म्हणून त्याला पत्नीसह पकडून आता भोसरी नवीन रूग्णालयात दाखल करणार आहे.

जोडप्याने मास्क लावून केलं लग्न अन्...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: home quarantine people walking on road