Coronavirus : शपथ ! मी पिंपरी चिंचवडकर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 April 2020

पिंपरी शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच संख्येत भर पडत असल्याने अवघे शहर "रेडझोन'मध्ये आले आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, सामान्य नागरीकांनी घरात बसूनच व्हायरसच्या विरोधात शपथ घेण्यास सुरवात केली आहे. "मी पिंपरी चिंचवडकर शपथ घेतो की माझे शहर रेड झोनमधून ऑरेंज झोनमध्ये व तेथून ग्रीन झोन मध्ये 30 एप्रिल पर्यंत घेऊन जाण्यासाठीचे सर्वतोपरी प्रयत्न करणार' ही टॅगलाईन घेवून सोशल मीडियावर मोहिम राबविली जात आहे. व्हॉट्‌सऍप डीपी, स्टेटस्‌, फेसबुकवर या बाबतचे फोटो मोठ्या प्रमाणात झळकत आहेत.

आपल्या शहराला ग्रीन झोनमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन सोशल मीडियावरून फिरताहेत संदेश
पिंपरी - शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच संख्येत भर पडत असल्याने अवघे शहर "रेडझोन'मध्ये आले आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, सामान्य नागरीकांनी घरात बसूनच व्हायरसच्या विरोधात शपथ घेण्यास सुरवात केली आहे. "मी पिंपरी चिंचवडकर शपथ घेतो की माझे शहर रेड झोनमधून ऑरेंज झोनमध्ये व तेथून ग्रीन झोन मध्ये 30 एप्रिल पर्यंत घेऊन जाण्यासाठीचे सर्वतोपरी प्रयत्न करणार' ही टॅगलाईन घेवून सोशल मीडियावर मोहिम राबविली जात आहे. व्हॉट्‌सऍप डीपी, स्टेटस्‌, फेसबुकवर या बाबतचे फोटो मोठ्या प्रमाणात झळकत आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाने चांगलेच डोके वर काढले आहे. दीड महिन्यात 52 रूग्ण रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 3 मेपर्यंत देशभरात लॉकडाऊन आहे. तसेच संचारबंदी देखील लागू केली आहे. यामुळे नागरिक घरात बसून आहेत. सर्वांपासून अलिप्त राहणे आणि स्वत:ची काळजी घेणे या दोन प्रमुख उपाययोजना प्रत्येकाने केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही. याबाबत महापालिकेकडून जनजागृती केली जात असतानाही काही नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी रूग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे पुन्हा नागरिकांनी जनजागृतीबाबत पुढाकार घेत "मी पिंपरी-चिंचवडकर' ही सोशल मीडियावर मोहिम तीव्र केली आहे. " मी पिंपरी चिंचवडकर शपथ घेतो की माझे शहर रेड झोन मधून ऑरेंज झोनमध्ये व तेथून ग्रीन झोन मध्ये 30 एप्रिल पर्यंत घेऊन जाण्यासाठीचे सर्वतोपरी प्रयत्न करणार' या आशयाचे संदेश व्हायरल केले जात आहेत. सोशल मिडीयावरील या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. या संदेशाचे नागरिक आपले व्हॉट्‌सऍप डीपी, स्टेटस्‌, फेसबुकवर टाकत असल्याचे दिसून येतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I swear by Pimpri Chinchwadkar