esakal |  "होम क्वारंटाइन'च्या काळात असा आहार घेऊन अशी वाढवा प्रतिकारशक्ती 
sakal

बोलून बातमी शोधा

contorl-coronavirus

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सगळ्यांत जास्त वाटा आहाराचा आहे. "होम क्वारंटाइन'च्या काळात आहार घेऊन आपली प्रतिकारशक्ती वाढवा.

 "होम क्वारंटाइन'च्या काळात असा आहार घेऊन अशी वाढवा प्रतिकारशक्ती 

sakal_logo
By
डॉ. प्रणिता अशोक, आहारतज्ज्ञ

कोरोना व तत्सम विषाणूंच्या आजारांशी लढण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती चांगली असणे आवश्‍यक आहे. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सगळ्यांत जास्त वाटा आहाराचा आहे. "होम क्वारंटाइन'च्या काळात असा आहार घेऊन आपली प्रतिकारशक्ती वाढवा. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ड्राय फ्रूट : ड्राय फ्रुटची पावडर मुलांना दुधातून दिली तर हेल्थ ड्रिंक द्यायची गरज नाही. ड्राय फ्रुट्‌समध्ये essential oils असतात, जे प्रतिकारशक्ती वाढविण्यास व शरीराची वाढ होण्यास मदत करतात. मुलांची वाढ व्यवस्थित झाली तर प्रतिकारशक्ती वाढते. ड्राय फ्रुट्‌समध्ये विटामिन ई व ओमेगा फॅटी ऍसिडस्‌ मोठ्या प्रमाणात असतात. 

पालेभाज्या व फळभाज्या : भाज्यांमधून जीवनसत्त्व आणि खनिज मिळतात. भाज्या खाणे टाळले तर त्याची कमतरता निर्माण होऊ शकते. मुलांना भाजी खायचा कंटाळा येतो मग तुम्ही घरी पराठा किंवा सूप करू शकता. विकत मिळणारी रेडी टू इट सूपची पाकिटे आणण्याचे टाळा. कारण त्यात प्रिझरवेटीवज किंवा रासायनिक घटक व मिठाचे प्रमाण जास्त असते. प्रिझरवेटीवज किंवा रासायनिक घटक यामुळे कर्करोग होण्याची शक्‍यता वाढते व मीठ जास्त असल्यामुळे वजन वाढू शकते. 

मनातला कोरोना :  हवा स्वतःच्या दृष्टिकोनावर आढळ विश्वास 

भाकरी/ पोळी व भात : हे पदार्थ जर वजन कमी करण्यासाठी टाळत असाल तर तुम्हाला रोजची कामे करण्यासाठी आवश्‍यक उर्जा कमी पडणार. तसेच स्नायूमधील प्रोटीन कमी होणार. प्रतिकारशक्तीसाठी आपणास प्रथिने आवश्‍यक असतात. कर्बोदके कमी प्रमाणात मिळाली तर शरीर प्रथिन वापरणार व तुमची प्रतिकारशक्ती कमी होणार. त्यामुळे भाकरी, पोळी व भात खाणे टाळू नका. 

प्रथिन : प्रथिनांसाठी तुम्ही कडधान्य, मासांहारी पदार्थ जसे की चिकन, मटण, मासे इत्यादी. शाकाहारींसाठी प्रथिनांचा स्रोत म्हणजे दुध व दुधाचे पदार्थ तसेच मोड आलेली कडधान्ये. कोरोना विषाणूमुळे अनेकांनी चिकन, मटण इत्यादी खाणे बंद केले आहे; पण जर तुम्ही ताजे चिकन आणले व घरी नीट शिजवून केले तर काही त्रास होणार नाही. मासांहारी पदार्थ प्रमाणात खा म्हणजे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा. दुध व ताक ही हेल्थ ड्रिंक्‍स आहेत व ती पिणे टाळू नका. 

फळे : ताज्या फळातून जे विटामिन्स व खनिजे मिळतात, ती ज्युस किंवा टेट्रा पॅक ज्यूसमधून मिळणार नाहीत. फळे खाल्ली की तुम्हाला फायबर्स व शरीराला आवश्‍यक पाणी मिळते. विकतचे ज्यूस किंवा ज्युसच्या स्वरुपात फळे घेऊ नका. कारण त्यात फायबर्स व शरीराला आवश्‍यक पाणी मिळणार नाही. फायबर्समुळे पचनशक्ती सुधारते. फळे खाल्ली की त्यात असलेली विटामिन्स व खनिजे शरीरात शोषली जातात. विटामिन्स व खनिजे गोळीच्या स्वरुपात घेतली तर ती शरीरात नीट शोषली जात नाही मग प्रतिकारशक्ती कशी वाढणार? 

व्यायाम : रोज एक तास चालणे आवश्‍यक आहे. एक तास सलग चालणे शक्‍य नसेल तर दिवसातून दोनदा अर्धा तास किंवा चारदा पंधरा मिनिटे चाला. करोनामुळे लॉकडाऊन आहे तर तुम्ही घरी चालू शकता किंवा इंटरनेटवर घरी कसा व्यायाम करता येईल याचे अनेक one mile walk, spot jogging असे अनेक व्हिडीयो सापडतील त्याचा वापर करा. प्राणायामसारखे श्‍वसन निगडीत व्यायाम करण्यास विसरू नका. 

loading image
go to top