Coronavirus : लाँन्ड्री कामगारांवर उपासमारीची वेळ...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 April 2020

लॉकडाऊनच्या काळात सर्वात उपेक्षिला गेलेला वर्ग म्हणजे लॉन्ड्री कामगार हा होय. पतीपत्नी दोघेही नोकरी करीत असल्याने या चाकरमानी लोकांना कपडे धुणे व त्यांना इस्त्री करणे हे सर्वात जास्त कंटाळवाने वाटते. त्यामुळे सध्याच्या काळात या लॉन्ड्री कामगारांना चांगले दिवस येत असताना या लॉकडाऊन मध्ये उपासमारीची वेळ आली आहे. पिंपरी चिंचवड शहरात अनेक सेवाभावी संस्था, घरकुल सोसायट्या रस्त्यावरील मजुरांना किराणा व जेवन देत आहेत.

नवी सांगवी (पुणे) - लॉकडाऊनच्या काळात सर्वात उपेक्षिला गेलेला वर्ग म्हणजे लॉन्ड्री कामगार हा होय. पतीपत्नी दोघेही नोकरी करीत असल्याने या चाकरमानी लोकांना कपडे धुणे व त्यांना इस्त्री करणे हे सर्वात जास्त कंटाळवाने वाटते. त्यामुळे सध्याच्या काळात या लॉन्ड्री कामगारांना चांगले दिवस येत असताना या लॉकडाऊन मध्ये उपासमारीची वेळ आली आहे. पिंपरी चिंचवड शहरात अनेक सेवाभावी संस्था, घरकुल सोसायट्या रस्त्यावरील मजुरांना किराणा व जेवन देत आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आजच्या परिस्थितीत सर्वच बाजुंनी या मजुरांना मोठ्या प्रमाणात मदत येत असल्याने देणारे हात हजार झाले आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. परंतु हजारो मैलावरून पोटापाण्याची खळगी भरण्यासाठी आलेल्या या लॉन्ड्री कामगारांना ना धड भीक मागता येत ना हाताला कसले काम. त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबाची मोठी वाताहत झाली आहे. 

कोरोणाचा संसर्ग आपल्याकडे तीन आठवड्यांपुर्वी झाला, परंतु त्या आजाराचा प्रचार आधीच होऊ लागला होता. त्यातच कोरोणाचा विषाणु कपड्यांवरही तग धरून राहु शकतो या कारणांमुळे लोकांनी लॉन्ड्रीत कपडे धुवायला देणेच बंद केले. त्यामुळे या कामगाराला आता स्वतःसह त्याच्या कुटुंबियांचा चरितात्र कसा चालवायचा याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे शहरातील स्वयंसेवी संस्थांनी या लॉन्ड्री कामगारांचा सहानुभुती पुर्वक विचार करण्याची वेळ आता आली आहे हे नक्कीच.

पिंपळे सौदागर - लॉकडाऊनमुळे हाताला काम नसलेल्या लॉन्ड्री कामगारांवर उपासमारीचे मोठे संकट उभे राहिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: laundry business collapse by coronavirus