'इथं'ही सुरु आहे लॉकडाऊन...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 एप्रिल 2020

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नाणे व आंदर मावळ भागातील असलेल्या डोंगरापठावरील वाड्या लाॅकडाऊन करण्यात आल्या आहेत. 

टाकवे बुद्रुक : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नाणे व आंदर मावळ भागातील असलेल्या डोंगरापठावरील वाड्या लाॅकडाऊन करण्यात आल्या आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गावे व शहरे लाॅकडाऊन करण्यात आल्याने नागरिक घरी बसून कंटाळले आहेत. बाहेरही कुठे फिरता येत नसल्याने नागरिक व पर्यटक रानमेव्यांचा आस्वाद घेण्यासाठी डोंगराभागाकडे वळू लागले आहेत.

डोंगरावर नागरीकांची व पर्यटकांची संख्या वाढू लागल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्या पठारावर, आपल्या वाड्यांमध्ये नको या हेतूने स्थानिकांनीही कच्चे रस्ते खोदले आहेत व झाडे तोडून रस्त्यांमध्ये ठेवली आहेत व आपापल्या वाड्या लाॅकडाऊन केल्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lock Down also on Hill and Mountain do not go there

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: