Coronavirus : कामशेत सह परिसरात लाॅकडाऊनची ऐसी कि तैसी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 April 2020

कामशेत सह परिसरात लाॅकडाऊनची ऐसी कि तैसी झाली आहे. येथील हुल्लडबाज तरूण विनाकारण भटकत आहेत. शहर पोलीसांनी ५३ जणांवर संचारबंदीचे उल्लंघन केल्या बद्दल गुन्हे दाखल केले आहेत. तर त्यापैकी काही जणांना न्यायालयाने दंडही ठोकावला आहे. शासनाचे आदेश बस्तानात गुंडाळून ठेवून नागरिक रस्तावर गर्दी करीत आहेत. यांना कोणीतरी रोखा, अशी साद शहरातील जाणकार घालीत आहेत. तर अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गर्दीचा भस्मासुर शहरात वाढतो आहे.

कामशेत - कामशेत सह परिसरात लाॅकडाऊनची ऐसी कि तैसी झाली आहे. येथील हुल्लडबाज तरूण विनाकारण भटकत आहेत. शहर पोलीसांनी ५३ जणांवर संचारबंदीचे उल्लंघन केल्या बद्दल गुन्हे दाखल केले आहेत. तर त्यापैकी काही जणांना न्यायालयाने दंडही ठोकावला आहे. शासनाचे आदेश बस्तानात गुंडाळून ठेवून नागरिक रस्तावर गर्दी करीत आहेत. यांना कोणीतरी रोखा, अशी साद शहरातील जाणकार घालीत आहेत. तर अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गर्दीचा भस्मासुर शहरात वाढतो आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पोलीस प्रशासनाने कितीही धाक दाखवला तरी, अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गर्दीतील मंडळी शहरात राजरोसपणे फिरत असतात. सकाळी साडेनऊ ते साडेबारा वाजेपर्यंत गर्दीचा जोर कायम आहे. शिवाजी महाराज चौक, पवनानगर कडे जाणारा बाजारपेठेतील मुख्य रस्ता, नाणेरोड आणि संभाजी महाराज चौकात गर्दी होते. 

गर्दीचे कारण
या परिसरात खरेदीसाठी येणारे नागरिक, दुकानात किराणा माल खरेदीसाठी अथवा रस्त्याच्या कडेला भाजी विक्री करणाऱ्यांकडून भाजी खरेदी साठी गर्दी होते. खरेदीदार आणि दुकानदार सोशल डिस्कशन पाळीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कोणत्याही ग्राहकांच्या हातावर सॅनिटायझर ओतले जात नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक असणारी फारशी खबरदारी घेताना येथे दिसत नाही. 

पोलीसांचा कायद्याचा बडगा, आरोग्य विभागाचे सर्वेक्षण आणि ग्रामपंचायतीचे निर्जंतुकरण, शहरात पोलीस कायद्याचा धाक दाखवून लाॅकडाऊन आणि १०० टक्के संचारबंदी करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी पोलीसांनी कंबर कसली आहे. पण पोलीसांनी पाठ फिरवताच जैसे थे परिस्थिती होते. आरोग्य विभागाने सर्वेक्षणासाठी घरघर पछाडले आहे. घरोघरी जाऊन हे कर्मचारी आरोग्य सेवा देत आहे. तर ग्रामपंचायतीने शहरातील कानाकोपर्‍यात निर्जंतुक फवारणी केली आहे. गोरगरिबांच्या घरची चूल पेटावी म्हणुन सामाजिक संस्था संघटनांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

कोणी कोरडा शिधा देते, तर कोणी पोटभर जेवण शिजवून देत आहे. शहरातील आजमितीला ही सगळी पार्श्वभूमी असली तरी शहरातील गर्दी कमी होता होत नाही. लाॅकडाऊन यशस्वी करण्यासाठी शहरातील व्यापारी, सर्व राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते, ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा आणि पोलीस प्रशासनाने योग्य सहकार्य करावे या मागणीने शहरात जोर धरला आहे. शहरातील नागरिक खाजगीत आता बोलू लागले आहेत. 

अत्यावश्यक सेवा पुरवणारे काही बहादूर दुचाकीला रिकामे दुधाचे कॅन अडकवून शहरात येत आहे. पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल टाकून घेत आहेत. याचा वेळीच बंदोबस्त करावा याही मागणीने जोर धरला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lockdown ignore by public in kamshet