रुग्णांची संख्या वाढल्यास लॉकडाऊनमध्येही वाढ? 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 April 2020

सध्या तीन मे पर्यंत लॉकडाऊन राहील. मात्र, यापुढील काळात नागरिकांनी स्वयंशिस्त न पाळल्यास तसेच रुग्णांची संख्या वाढतच राहिल्यास लॉकडाऊनमध्ये वाढ होऊ शकते. 

पुणे - मुंबई, पुण्यासह राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून, लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढविण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. परंतु सद्यस्थितीत तीन मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहील. मात्र, रुग्णांची संख्या वाढतच राहिल्यास यापुढील काळात लॉकडाऊनमध्ये वाढ होऊ शकते, असे संकेत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे, मुंबईसह राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्य सरकारने हॉटस्पॉट वगळता अन्य काही भागात उद्योगांना परवानगी दिली आहे. त्यामुळे काही प्रमाणात रोजगारावरील संकट काही प्रमाणात दूर होण्यास मदत होत आहे. तथापि राज्यातील लॉकडाऊन कधी संपणार, परिस्थिती पूर्वपदावर कधी येणार? रेल्वे, बसेस, लोकल सेवा पुन्हा कधी सुरू होणार, असे अनेक प्रश्न नागरिकांना पडले आहेत. त्यातच पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढविण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या संदर्भात जिल्हाधिकारी राम यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सध्या तीन मे पर्यंत लॉकडाऊन राहील. मात्र, यापुढील काळात नागरिकांनी स्वयंशिस्त न पाळल्यास तसेच रुग्णांची संख्या वाढतच राहिल्यास लॉकडाऊनमध्ये वाढ होऊ शकते. परंतु याबाबत अंतिम निर्णय केंद्र व राज्य सरकार घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. स्वयंशिस्त पाळावी. कोरोनाला हरवण्यासाठी नागरिकांनी आपल्या घरी सुरक्षित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राम यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown increases as the number of patients increases