#Lockdown : कामशेत : तुम्हाला काय करायचे ते करा, आम्ही गर्दी करणारच!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 April 2020

लाॅकडाऊन आणि संचारबंदी लागू केली असूनही खडकाळयाची बाजारपेठ गजबजलेली आहे. येथे सोशल डिस्टंसिंगचे तीन तेरा वाजले आहे. ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन देखील यापुढे हतबल झाले आहेत. कायद्याचा कितीही धाक दाखवला तरी दुपारपर्यत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढत आहे. त्यातच शहरात बंदिस्त गटार योजनेच्या कामाची खोदाई बाजारपेठेतून सुरू आहे.

कामशेत - लाॅकडाऊन आणि संचारबंदी लागू केली असूनही खडकाळयाची बाजारपेठ गजबजलेली आहे. येथे सोशल डिस्टंसिंगचे तीन तेरा वाजले आहे. ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन देखील यापुढे हतबल झाले आहेत. कायद्याचा कितीही धाक दाखवला तरी दुपारपर्यत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढत आहे. त्यातच शहरात बंदिस्त गटार योजनेच्या कामाची खोदाई बाजारपेठेतून सुरू आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

त्यामुळे रस्त्याच्या कडेला कोठेही अस्ताव्यस्त वाहने उभी केली आहेत. ग्रामपंचायत प्रशासन, शासनाने दिलेल्या आदेशाचे आणि आरोग्य विभागाच्या सूचनांचे नागरिकांनी पालन करणे, यासाठी प्रयत्नशील आहेत. वॉर्डात, चौकात जावून जनजागृती करीत आहेत. पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे शासनाच्या आदेशाच्या सूचना ध्वनीक्षेपनावरून संपूर्ण शहर आणि पंचक्रोशीत सांगत आहेत. संचारबंदीचे उल्लंघन केलेल्या आणि विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या कित्येक दुचाकी वाहन चालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यांना न्यायालयाने दंड किंवा शिक्षा सुनावली आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सगळे प्रशासन सोशल डिस्टक्शन आणि कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आरोग्य विभागाने सर्वेक्षणाच्या तीन फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. आरोग्य कर्मचारी आशा वर्कर्स कोरोनाचे गांभीर्य नागरिकांना सांगताना, संयम राखा घराबाहेर पडू नका असे वारंवार सांगत असतानाही शहरात होणारी गर्दी धोक्याची घंटा आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करा असे भावनिक आवाहन सरपंच रूपाली शिनगारे, ग्रामविकास अधिकारी प्रताप माने आणि पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown Kamshet Market Mob Public