एमबीए झालेल्या तरुणाचे संशोधन; असे बनवले निर्जंतुकीकरण यंत्र

निलेश बोरुडे
Tuesday, 21 April 2020

- एमबीए झालेल्या तरूणाचे संशोधन; अल्ट्रा व्हायोलेट लाईटचा उपयोग करून बनवले निर्जंतुकीकरण यंत्र.

किरकटवाडी : एमबीएचे शिक्षण झालेल्या किरकटवाडी (पुणे) येथील समीर नाईक या तरुण व्यावसायिकाने आपल्या व्यवसायातील अनुभवातून अल्ट्राव्हायोलेट लाईटचा उपयोग करून घरगुती निर्जंतुकीकरण यंत्र तयार केले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बाजारातून आणलेल्या भाज्या-फळे, किराणामाल व इतर वस्तूंचे या यंत्रामध्ये ठेवल्यानंतर अवघ्या 30 सेकंदांमध्ये निर्जंतुकीकरण होत आहे. निर्जंतुकीकरण करण्यासाठी अल्ट्राव्हायोलेट लाईट उपयुक्त असल्याचे यापूर्वीच झालेल्या अनेक संशोधनांमधून सिद्ध झालेले आहे.

समीर माईक यांनी तयार केलेले कमी खर्चातील हे यंत्र घरगुती व गृहनिर्माण संस्था यांच्या एकत्रित उपयोगासाठी नक्कीच उपयुक्त व कोरोणाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून फायदेशीर ठरु शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MBA Student Develop Sanitation Machine in Pune