Coronavirus : 'शांताबाई' फेम संजय लोंढे यांच्यासह लोककलावंतांना महिनाभराचा धान्यसाठा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 April 2020

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊननंतर झोपडपट्टीतील गरीब, बेघर मजूर आणि लोककलावंतांचे होत असलेले हाल पाहून त्यांच्या मदतीला सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धाव घेतली. या सर्व लोककलावंतांना महिनाभर पुरेल इतका धान्यसाठा आणि किराणा सामान देण्यात आले.

पुणे - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊननंतर झोपडपट्टीतील गरीब, बेघर मजूर आणि लोककलावंतांचे होत असलेले हाल पाहून त्यांच्या मदतीला सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धाव घेतली. या सर्व लोककलावंतांना महिनाभर पुरेल इतका धान्यसाठा आणि किराणा सामान देण्यात आले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लॉकडाऊनमुळे झोपडपट्टीत राहणाऱ्या लोककलावंतांचा कामधंदा बुडाल्यामुळे त्यांना कुटुंबाची उपजिविका चालविणे अवघड झाले होते. नाना पेठेतील राजेवाडी येथील झोपडपट्टी राहणाऱ्या 'शांताबाई' फेम गायक संजय लोंढे यांच्यासह इतर काही लोककलावंतांची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे त्यांचे हाल सुरू होते. ही माहिती मिळाल्यानंतर पुण्याच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांनी झोपडपट्टीत जाऊन काही प्रमाणात मदत केली. तसेच, या लोककलावंतांना धान्याची मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शैलेश जगताप मित्रमंडळातील कार्यकर्त्यांनी या सर्व लोककलावंतांना महिनाभर पुरेल इतका धान्यसाठा वितरित केला.

माजी पोलीस कर्मचारी शैलेश जगताप, परवेज जमादार, बांधकाम व्यावसायिक विक्रम अगरवाल, अमीत गुप्ता, सचीन चव्हाण, जयेश जगताप, अमीत करपे, जितेंद्र ढमाले, सुनील दरेकर व रणरागिनी महिला मंचच्या उज्वला गौड यांनी रास्ता पेठेत गुरुवारी लोककलावंतांना गहू, तांदूळ, डाळी, तेल यासह इतर किराणा सामानाचे वाटप केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A months worth of foodgrains to folk artists including Sanjay Londhe