नारायणगाव, आळेफाटा येथील साठ पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 April 2020

जगदंब प्रतिष्ठान ,जुन्नर तालुका मेडिकल असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन शिवनेरी व विघ्नहर मेडिकल फाउंडेशन यांच्या वतीने  नारायणगाव, आळेफाटा येथील साठ पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. अशी माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.

नारायणगाव - जगदंब प्रतिष्ठान ,जुन्नर तालुका मेडिकल असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन शिवनेरी व विघ्नहर मेडिकल फाउंडेशन यांच्या वतीने  नारायणगाव, आळेफाटा येथील साठ पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. अशी माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मधुमेह, रक्तदाब आदी तपासण्या या वेळी करण्यात आल्या.डॉ. सदानंद राउत,डॉ.सागर फुलवडे,डॉ. अमेय डोके,डॉ.योगेश पाटील,डॉ.मिलींद घोरपडे,डॉ. जालिंदर वाजे,डॉ. तुषार गोरडे, डॉ. लहु खैरे,डॉ. वर्षा गुंजाळ डॉ .मनोहर कवडे यांनी आरोग्य तपासणीसाठी सहकार्य केले. खासदार डॉ. कोल्हे म्हणाले  लॉक डाऊन जाहीर झाल्यापासून कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  पोलीस अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस बंदोबस्त करीत आहेत.कोरोना संसर्गाचा धोका पोलिसांना निर्माण होऊ शकतो.जगदंब प्रतिष्ठानच्या वतीने पोलिसांच्या आरोग्य तपासणीसाठी मोफत मोबाईल क्लिनिकची व्यवस्था केली आहे. पोलीस व पत्रकारांना जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वाटप केले आहे.

या वेळी डॉक्टरांच्या वतीने नारायणगाव ग्रामपंचायतीसाठी ५१ हजार रुपयांच्या ग्रामनिधीचा धनादेश  सरपंच योगेश पाटे यांना देण्यात आला.आमदार अतुल बेनके म्हणाले पोलीस व प्रशासन यांनी केलेल्या उपाययोजना या मुळे जुन्नर तालुक्यात कोरोना संसर्ग रोखण्यात यश आले आहे. या वेळी  तहसीलदार हनुमंत कोळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पवार, सरपंच योगेश पाटे, ज्येष्ठ पत्रकार डी के वळसे-पाटील आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: narayangav and aalephata police officer and employee health checking