सावधान! पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना संसर्गाने शंभरी ओलांडली

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 April 2020

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींची संख्या 106 झाली आहे. मंगळवारी सकाळी 10 जणांचे रिपोर्ट पाॅझिटिव्ह आले. यात निगडी-रुपीनगर येथील नऊ जणांचा समावेश आहे.  

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींची संख्या 106 झाली आहे. मंगळवारी सकाळी 10 जणांचे रिपोर्ट पाॅझिटिव्ह आले. यात निगडी-रुपीनगर येथील  नऊ जणांचा समावेश आहे. तर एक महिला खडकीतील आहे.

Video : आठ बाय आठ फुटांच्या खोलीत, कसं पाळायचं डिस्टंसिंग?

रुपीनगरमध्ये सातत्याने रुग्ण संख्या वाढत आहे. यापूर्वी एकाच दिवशी 12 जण आढळले होते. काल सात आणि आज नऊ जण पाॅझिटिव्ह आढळले आहेत. आजपर्यंत या परिसरात  28 रुग्ण आढळले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, महापालिकेने सोमवारी (ता.  27) 171 जणांचे  नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले होते. त्याचे काही रिपोर्ट आज सकाळी आले आहेत. त्यात रुपीनगर परिसरातील सहा पुरुष आणि तीन महिला असे नऊ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील पुरुषांचे वय 16, 18, 22, 27,  34 वर्ष असून महिलांचे वय 15, 18 आणि 19 आहे. हे सर्व जण हायरिस्क कॉन्टॅक्टमधील आहेत. 

"लिव्ह इन रिलेशनशिप'"मध्ये राहणाऱ्या जोडप्यात लॉकडाऊनमुळे उडाले खटके; मग...!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of people infected with corona in Pimpri-Chinchwad is 106