Coronavirus : मृत्यू झाल्यास एक कोटी रुपये; पुणे महापालिकेचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 April 2020

कंत्राटी कामगारांना दिलासा
महापालिकेच्या आरोग्य खात्यात सध्या कंत्राटी कामगार आहेत. तेही कोरोनाविरोधातील मोहिमेत काम करीत आहेत. अशा कर्मचाऱ्यांच्या कामांची नोंद महापालिकेने घेतली आहे. त्यांच्या मानधनात वाढ करण्यासोबत महिन्याकाठी वेळेत आणि कोणत्याही प्रकारची कपात न करण्याच्या सूचना संबंधित खात्याला दिल्या आहेत. त्याशिवाय, या खात्याकडील ठेकेदारांशीही चर्चा केल्याचे महापौर मोहोळ यांनी सांगितले.

पुणे - कोरोनाची लागण होऊन, मृत्युमुखी पडल्यास महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वारसांना एक कोटी रुपये आणि महापालिकेच्या सेवेत घेण्याचा निर्णय महापालिकेतील गटनेत्यांनी घेतला आहे. त्यानुसार या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षाकवच योजना अमलात आणावी, असा आग्रह महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका आयुक्तांकडे धरला आहे.  

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यात कोरोनाचा रुग्ण सापडल्यापासून त्यावर महापालिकेच्या आरोग्य विभागातील डॉक्‍टर, परिचारिका आणि अन्य कर्मचारी उपचार करीत आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता ते रुग्णांवर योग्य आणि वेळेत उपचार करत आहेत. त्यामुळे आतापर्यंत काही रुग्ण ठणठणीत झाले असून, उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. मात्र, अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण होण्याची भिती निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर खबरदारी म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने आपापल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुरक्षाकवच पुरविले आहे; त्याच अनुषंगाने महापालिकेनेही आपले अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी ही योजना लागू करावी, असेही मोहोळ यांनी आयुक्त शेखर गायकवाड यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One crore rupees in case of death; Pune Municipal Corporation decision by coronavirus