Coronavirus : पुण्यात अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 April 2020

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातही ऑनलाइन क्लासरूम उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यातून विद्यार्थ्यांना घरबसल्या मार्गदर्शन केले जात आहे.

मांजरी (पुणे) : सध्या लॉकडाउनमुळे सर्वच शैक्षणिक संस्थांचे कामकाज बंद आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून अनेक संस्थांनी वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सुरु केले आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातही ऑनलाइन क्लासरूम उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यातून विद्यार्थ्यांना घरबसल्या मार्गदर्शन केले जात आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाविद्यालयातील शिक्षकांच्या मार्फत झूम ॲप व गुगल क्लासरूमचा प्रभावीपणे वापर करून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकविण्याचे काम सुरू आहे. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुस्तके, प्रश्नावली पाठविण्यात येत आहे.

Coronavirus : आम्हाला मदत करा, पाकिस्तानची भारताकडे औषधांची मागणी

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रितेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या परिपूर्ण शैक्षणिक तयारीसाठी महाविद्यालयातील अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र शाखेच्या अभ्यासक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. व्हॉटसअप व फेसबुक या सोशल मीडिया माध्यमांचा याकामी योग्य वापर केला जात आहे. पालक व विद्यार्थ्यांकडून या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online guidance of students from Engineering College in Pune