सर्व संशयितांची टेस्ट निगेटिव्ह आल्याने आता बारामतीत...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 5 April 2020

कोरोनाबाधित रिक्षाचालकाची प्रकृती वेगाने सुधारत असून, बारामतीतील सर्व संशयितांची टेस्ट निगेटिव्ह आल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. 

बारामती : कोरोनाबाधित रिक्षाचालकाची प्रकृती वेगाने सुधारत असून, बारामतीतील सर्व संशयितांची टेस्ट निगेटिव्ह आल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. बारामतीत कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर संबंधित परिसर सील करण्यात आला होता. आता सात दिवसात परिस्थिती सुधारली असून, बारामतीकरांसाठी ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी झाल्यामुळे परिसरात एकही कोरोनाबाधित रुग्ण नसून, जे कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेले होते, त्या सर्वांच्या टेस्ट निगेटीव्ह आल्या आहेत. त्या मुळे सर्वांनीच सध्यातरी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. 
बारामतीकरांनी लॉकडाऊनचे ब-यापैकी पालन केल्याने बारामतीत स्थिती नियंत्रणाखाली असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी सांगितले.

लोकांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे असून, लॉकडाऊनचा कालावधी संपेपर्यंत तरी घरातच राहणे आवश्यक आहे. शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सूचनांचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे. 

उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील व अण्णासाहेब घोलप यांनी बारामती शहर व तालुक्यात चोख पोलिस बंदोबस्त ठेवला असून, विनाकारण रस्त्यावर येणा-यांविरुध्द पोलिस कारवाई करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Peoples of Baramati now Tension Free After Reports negative of Other Peoples