Coronavirus : पिंपरी : निवासाची व्यवस्था असेल तरच मिळणार परवानगी... 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 April 2020

उद्योगाची थांबलेली चाके सुरु करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत असतानाच पुणे जिल्ह्यातल्या चाकण, तळेगाव, रांजणगाव, नगर रोड या ग्रामीण भागातील उद्योगांना कामकाज सुरु करायचे असेल तर फॅक्‍टरीच्या परिसरातच कमीत कमी कर्मचाऱ्यांची निवासाची व्यवस्था करावी लागणार आहे. याखेरीज कारखान्यापासून 100 मीटरच्या परिसरात राहाणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याठिकाणी कामासाठी येता येणार असल्याचे उद्योग विभागाचे सहसंचालक सदाशिव सुरवसे यांनी सांगितले.​

पिंपरी - उद्योगाची थांबलेली चाके सुरु करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत असतानाच पुणे जिल्ह्यातल्या चाकण, तळेगाव, रांजणगाव, नगर रोड या ग्रामीण भागातील उद्योगांना कामकाज सुरु करायचे असेल तर फॅक्‍टरीच्या परिसरातच कमीत कमी कर्मचाऱ्यांची निवासाची व्यवस्था करावी लागणार आहे. याखेरीज कारखान्यापासून 100 मीटरच्या परिसरात राहाणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याठिकाणी कामासाठी येता येणार असल्याचे उद्योग विभागाचे सहसंचालक सदाशिव सुरवसे यांनी सांगितले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ग्रामीण भागातील उद्योगांना उत्पादन सुरु करण्याची परवानगी देण्याअगोदर त्यांनी कंपनीमध्ये किती कर्मचारी काम करणार आहेत, त्याची तपशीलवार माहिती उद्योग विभागाला देणे सक्‍तीचे करण्यात आले आहे. उद्योगांनी काम सुरु करत असताना ते कमीत कमी कर्मचाऱ्यांच्या साह्याने सुरु करावे, असेही त्यांनी सांगितले. 

उद्योगांना प्रत्यक्ष उत्पादन सुरु करण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. दरम्यान, उत्पादन प्रकल्प सुरु करत असताना त्याठिकाणी कोरोनाच्या सुरक्षिततेसाठी आवश्‍यक असणारी योग्य ती खबरदारी घेणे आवश्‍यक राहाणार आहे, त्यामध्ये कामाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, हातात ग्लोजचा वापर करणे, वारंवार हात धुणे, परिसर स्वच्छ ठेवणे आदी खबरदारी घ्यावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

पुणे, पिंपरी-चिंचवडमधील कर्मचाऱ्यांना परवानगी नाही.... 
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्यामुळे हा परिसर रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे या भागातील कारखानदारांना पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधे राहाणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलावता येणार नाही. तसे झाल्यास आढळल्यास संबधित उद्योगावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सुरवसे यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Permission is granted only if there is accommodation