आयुष डॉक्टरांना कोविड 19 बाबत ऑनलाईन प्रशिक्षण; पिंपरीत ७० टक्के डॉक्टरांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 April 2020

नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा)च्या पिंपरी चिंचवड शाखेचे सचिव डॉ.अभय तांबिले म्हणाले,"राज्यच नव्हे तर देशातील आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी (आयुष) डॉक्टरांना कोविड 19 या आजारावरील प्रतिबंधात्मक उपाय-योजनांचे ऑनलाईन प्रशिक्षण दिले जात आहे. पिंपरी चिंचवडमध्ये निमाचे 1400 डॉक्टर्स आहेत. त्यापैकी, 70 हून अधिक डॉक्टरांनी हे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. अनेक डॉक्टरांना प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्रे ही मिळाली आहेत."

पिंपरी : कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनतर्फे आयुष डॉक्टरांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड मधील 1400 निमा डॉक्टरांपैकी जवळपास 70 टक्क्यांहून अधिक डॉक्टरांनी हे प्रशिक्षण आतापर्यंत पूर्ण केले आहे. राज्यातील कोरोनाचा उद्रेक पाहता आयुष डॉक्टरांची मदत भासू शकते. हे लक्षात घेऊन राज्यभरातील आयुष डॉक्टर हे ऑनलाईन प्रशिक्षण घेत आहेत.
 
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा)च्या पिंपरी चिंचवड शाखेचे सचिव डॉ.अभय तांबिले म्हणाले,"राज्यच नव्हे तर देशातील आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी (आयुष) डॉक्टरांना कोविड 19 या आजारावरील प्रतिबंधात्मक उपाय-योजनांचे ऑनलाईन प्रशिक्षण दिले जात आहे. पिंपरी चिंचवडमध्ये निमाचे 1400 डॉक्टर्स आहेत. त्यापैकी, 70 हून अधिक डॉक्टरांनी हे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. अनेक डॉक्टरांना प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्रे ही मिळाली आहेत."

 Coronavirus : कोरोनासाठी पुण्यात स्वतंत्र रूग्णालय; सरकारचा प्रस्ताव

या प्रशिक्षण कार्यक्रमात कोरोना विषाणूचा कसा प्रसार होतो, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय-योजना काय? क्वारंटाइन आणि आयसोलेशन याच्यात काय फरक आहे. ? गरम पाण्यात विषाणू मरतो का?, कोणत्या रूग्णांना या आजाराचा जास्त धोका आहे.? आदी 20 गुणांची परीक्षा घेण्यात आली होती.

खासदार, आमदारांच्या ॲम्ब्युलन्स ताब्यात घ्या ! 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pimpri 70 % Ayush doctors participate in Online training for covid 19