पिंपरीत कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह; पण महिलेचा मृत्यू

टीम ई-सकाळ
Tuesday, 21 April 2020

वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या दोघांचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे.

पिंपरी Coroanvirus : श्वसनाचा त्रास होत असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या महिलेच्या घशातील द्रवाचे नमुने पाच दिवसांपूर्वी एन आय वरही कडे तपासण्यात आले. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. मात्र, दक्षता म्हणून उपचार सुरूच होते. पण मंगळवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे वय अंदाजे 40 होते. त्या वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित होत्या.  एका खासगी रुग्णालयात कार्यरत होत्या.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यापूर्वी दोघांचा मृत्यू
वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या दोघांचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे. त्यात खराळवाडीमधिल 55 वर्षीय पुरुष आणि 80 वर्षीय महिलेचा समावेश आहे. या दोघांचेही कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आलेले होते. पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मंगळवारी बाधितांचा आकडा ६४ वर पोहोचला आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri chinchwad woman died after negative covid test