Coronavirus : पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील महिलेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 April 2020

निगडी भागातील रहिवाशी असलेल्या आणि पुण्यातील कमांड हाॅस्पिटलमध्ये  उपचार सुरू असलेल्या कोरोनाबधित 62 वर्षीय महिलेचा सोमवारी (ता. 20) रात्री मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे गेलेला हा शहरातील दुसरा बळी आहे.

कोरोनाचा पिंपरी-चिंचवड शहरातील दुसरा बळी
पिंपरी - निगडी भागातील रहिवाशी असलेल्या आणि पुण्यातील कमांड हाॅस्पिटलमध्ये  उपचार सुरू असलेल्या कोरोनाबधित 62 वर्षीय महिलेचा सोमवारी (ता. 20) रात्री मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे गेलेला हा शहरातील दुसरा बळी आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

माजी सैनिकाची पत्नी असलेल्या या महिलेला18 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान, या महिलेला कोरोनाची लागण कशी झाली होती, याची माहिती समजू शकली नाही. मात्र, या महिलेच्या संपर्कातील चार जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. यापूर्वी रविवारी (ता. 9) 42 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या दोन झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri-Chinchwad woman dies while undergoing treatment at a hospital in Pune