Lockdown:"साहब जिंदगी है...चलती रहनी चाहिये...' 

गणेश कोरे 
Monday, 13 April 2020

शनिवारवाड्यालगत सध्या पोकलॅनचे केबीन हेच त्याचे विश्‍व बनले आहे.पोकलेनमध्येच राहणे,तथेच स्वयपांक करणे,येणाऱ्या दिवसाला सकारात्मक दृष्टिकोनातून तोंड देणे ही त्याची दिनचर्या

पुणे - कोरोना लॉकडाउनमध्ये अनेकजण विविध ठिकाणी अडकले आहेत. काही जण मानसिक खचले आहेत, तर काहीजण या संकटाला धीराने तोंड देत आहेत. यामधील एक आहे गोलू. गोलू कुमार उत्तरप्रदेशच्या सोन्दा गावातील तरुण. पोकलॅन ऑपरेटर. शनिवारवाड्यालगत सध्या पोकलॅनचे केबीन हेच त्याचे विश्‍व बनले आहे. पोकलेनमध्येच राहणे, तथेच स्वयपांक करणे आणि येणाऱ्या दिवसाला सकारात्मक दृष्टिकोनातून तोंड देणे ही त्याची दिनचर्या. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लॉकडाउनला एक महिना झाल्यानंतरही अडकून पडलेल्या गोलूने कोसो दूर असलेल्या आई, बहिणी आणि लहान भावाच्या आठवणीने व्याकूळ झाला तरी धीर सोडलेला नाही. गोलू म्हटला एक महिन्यापूर्वी पोकलॅनवर कंत्राटदार देवकर शेठच्या ओळखीने आलो. शनिवारवाड्यालगत गटाराचे काम सुरु होते. मात्र अचानक लॉकडाऊन सुरु झाला. माझ्या बरोबरचा एक जण ट्रेन बंद होण्याच्या अगोदर एक दिवस गावाला गेला. मात्र मी लॉकडाऊन मध्ये अडकलो. गावाकडे आई, पाचवीत शिकणार लहान भाऊ आणि बीए करणारी बहीण आहे. आई काळजीने रोज फोन करते इकडे निघून ये, पण आता जाता पण येत नाही. त्यामुळे पोकलेनचे केबीनच त्याने विश्‍व झाले आहे. 

गोलू बरोबर संवाद साधताना थोडा भावुक होऊन गोलू म्हणतो, साहब जिंदगी है..चलती रहनी चाहिये.  असा स्वतःच स्वतः आत्मविश्‍वास देत भात परतू लागतो. त्याने संसार थाटलेल्या पोकलेनवर. दिवस पोकलेनच्या केबीनमध्ये मोबाईलवर गाणी ऐकत काढायचा..रात्री पोकलेवरच स्वयंपाक करायचा आणि केबिनच आरके फ्लॅट समजून त्यातच झोपायचं. तर आंघोळीसाठी समोरच असलेल्या पालिकेच्या स्नानगृहाचा वापर करायचा... एरव्ही शनिवारवाड्या लगत असलेल्या खाऊ गल्लीत विविध चमचमीत पदार्थ खायला मिळाले असते. मात्र आता लॉकडाऊन मध्ये पोकलेनच त्याचा सख्खा सोबती आणि विश्‍व झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Poklen operator Golu confidence in lockdown

Tags
टॉपिकस