esakal | coronavirus : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रबोधन 
sakal

बोलून बातमी शोधा

police

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन केल्यास पोलिसांकडून दंडुक्‍याचा वापर केला जातो.तेच पोलिस कोरोनाला रोखण्यासाठी भावनिक साद घालत असल्याचेही दिसून येत आहे.

coronavirus : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रबोधन 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन केल्यास पोलिसांकडून दंडुक्‍याचा वापर केला जातो. मात्र, तेच पोलिस आता कोरोनाला रोखण्यासाठी भावनिक साद घालत असल्याचेही दिसून येत आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. गर्दी टाळण्यासाठी लॉकडाउन जाहीर केला असून, त्याचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी पोलिस रस्त्यावर उतरले आहेत. पावलोपावली बंदोबस्त तैनात आहे. आयुक्तालयाच्या हद्दीतील सीमारेषेवर तपासणी नाके उभारले असून, 63 ठिकाणी नाकाबंदी केली आहे. येथे चोवीस तास वाहनांची तपासणी केली जात आहे. यासह शहरात ठिकठिकाणी पोलिसांची गस्त सुरू आहे. विनाकारण फिरणाऱ्यांना दंडुक्‍याने प्रसाद देण्यासह सरकारी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कमल 188 अंतर्गत कारवाई केली जात आहे. 

Coronavirus : पुण्यातील बंद हॉस्पिटल सुरू होणार

पोलिस एकीकडे कारवाईचा बडगा उगारत असताना कोरोनासारख्या भयानक राक्षसाला हरविण्यासाठी नागरिकांना भावनिक आवाहनही करीत आहे. कोरोनावरील कविता तयार करून नागरिकांना स्पीकरवरून ऐकविण्यासह सोशल मीडियावरही व्हायरल केली जात आहे. यासह विविध पोलिस ठाण्यांनी आवाहन करणारे फलकही ठिकठिकाणी उभारले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या संकेतस्थळावरूनही नागरिकांना काळजी घेण्याबाबत आवाहन केले जात आहे. यामाध्यमातून पोलिसांचे संवेदनशील रूपही नागरिकांना पहायला मिळत आहे. 

नागरिकांमध्ये जागृती 
लोकप्रतिनिधी, पोलिस तसेच नागरिकांनी व्हॉट्‌सऍप ग्रुप तयार केलेले आहेत. यामध्ये पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी विविध प्रकारचे संदेश पाठवित असतात. कायद्याचे उल्लंघन केल्यास काय कारवाई होऊ शकते. कोरोनामुळे कसा धोका निर्माण होऊ शकतो, याबाबतची माहिती देणारे संदेश पाठविण्यासह व्हिडिओही पाठविले जात आहेत. 

loading image