#Lockdown2.0 : पोलिसांनी अतिशहाण्यांना दिला शब्दांचा मार

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 April 2020

संचारबंदी व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांना पोलिस लाठीचा मार देतात. मात्र, निगडी , प्राधिकरण या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या परिसरातील काही अतिशहाण्यांना निगडी पोलिसांनी शब्दांचा मार दिल्याचे पहायला मिळाले. शासनाच्या आदेशाचे पालन न करीत 'मॉर्निंग वॉक'साठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांच्या हाती उपहासात्मक फलक देत पोलिसांनी त्यांचे फोटोसेशन केले.

पिंपरी - संचारबंदी व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांना पोलिस लाठीचा मार देतात. मात्र, निगडी , प्राधिकरण या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या परिसरातील काही अतिशहाण्यांना निगडी पोलिसांनी शब्दांचा मार दिल्याचे पहायला मिळाले. शासनाच्या आदेशाचे पालन न करीत 'मॉर्निंग वॉक'साठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांच्या हाती उपहासात्मक फलक देत पोलिसांनी त्यांचे फोटोसेशन केले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. घराबाहेर पडू नका, असे नागरिकांना वारंवार आवाहन केले जात असतानाही कोणत्या ना कोणत्या कारणावरून नागरिक रस्त्यावर येत आहेत. अशाच प्रकारे शुक्रवारी (ता. 17) सकाळी निगडी, प्राधिकरणातील दहा नागरिक मॉर्निंग वॉक साठी घराबाहेर पडले. काही जणांसोबत त्यांचे पाळीव श्वानही होते. तर अनेकांनी तोंडाला रुमाल बांधलेला नव्हता. याबाबत निगडी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली.

''मी गाढव आहे, मला सांगितलेले कळत नाही, मी स्वार्थी आहे, मी कोरोना पसरविण्यास मदत करीत आहे, मी अति शहाणा आहे, मॉर्निंग वाकला चाललो आहे, मी आदेश पाळत नाही, कारण मी उच्चशिक्षित दीड शहाणा आहे, मी कोरोनाने मारणार व इतरांनाही मारणार, अशा आशयाचे फलक पोलिसांनी मॉर्निंग वॉक साठी निघालेल्या नागरिकांच्या हाती दिले. तसेच त्यांचे फोटोसेशनही केले . या नागरिकांवर शासन आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 188 अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police beat words to superhumans in lockdown