लॉकडाऊन असताना घराबाहेर पडू नकाच; नाहीतर...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 April 2020

- विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर पोलिस करणार कारवाई.

खेड-शिवापूर : राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारपासून ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने चित्रिकरण करण्यात येणार आहे. या चित्रिकरणात जे येतील, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, अशी माहिती राजगडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रेय दराडे यांनी दिली. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, तरीही अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करत आहेत. या पार्श्वभूमीवर राजगड पोलिसांनी ड्रोनच्या सहाय्याने चित्रिकरण करून गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Drones

याबाबत राजगडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रेय दराडे म्हणाले, राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारपासून आम्ही ड्रोनच्या सहाय्याने चित्रिकरण करणार आहोत. या चित्रिकरणामध्ये जे येतील, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Taking action against those who breaks Lock Down Rule

Tags
टॉपिकस
Topic Tags: