'जनता कर्फ्यू' आहे विनाकारण बाहेर पडू नका; नाहीतर...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

- कर्फ्यू लागू झालाय...घराबाहेर पडू नका...

मंचर : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. भारतातही याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूची घोषणा केली. त्यानुसार कर्फ्यू लागू झाला आहे. मात्र, विनाकारण रस्त्यावर येणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.

रेल्वे लॉक डाऊन ! देशातील रेल्वे वाहतूक 31 मार्चपर्यंत बंद 

पुणे-नाशिक रस्त्यावर व शहरांमध्ये शुकशुकाट होता. विनाकारण रस्त्यावर येणार्‍यांना मंचर पोलिसांनी उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. रात्री नऊपर्यंत कामाशिवाय रिकामटेकडे फिरणाऱ्यांना पोलिसांच्या शिक्षेला सामोरे जावे लागेल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

पुणे-नाशिक रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या तुरळक वाहनांचीही ही पोलिस कसून चौकशी करत होते. तातडीच्या कामासाठी जाणाऱ्यांना परवानगी दिली जात होती. पण हौसेने फिरणाऱ्यांना मात्र पोलिसी खाक्या दाखविल्या. त्यामध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक होते.

पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल लाड, पोलिस उपनिरीक्षक सागर खबाले यांच्यासह 50 हून अधिक पोलिस मास्क लावून रस्त्यावर उभे होते.

ज्येष्ठ नागरिकांना ते हात जोडून घराबाहेर पडू नका, असे सांगत होते. तर हिरो गिरीकरणाऱ्यांना मात्र पोलिसी खाक्या दाखवत होते. हे दृश्य मंचररकारांनी आज अनुभवले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Taking action against those who not follow Janata Curfew