Coronavirus:पिंपरी महापालिकेच्या मदतीला खासगी रुग्णालये 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 April 2020

कोरोनाचा सामना करण्यासाठी महापालिकेच्या मदतीसाठी शहरातील खासगी रुग्णालयेही पुढे सरसावली आहेत.आठ रुग्णालयात उपचार व तपासणीची सुविधा उपलब्ध आहे.

पिंपरी-कोरोनाचा सामना करण्यासाठी महापालिकेच्या मदतीसाठी शहरातील खासगी रुग्णालयेही पुढे सरसावली आहेत. आठ रुग्णालयात उपचार व तपासणीची सुविधा उपलब्ध आहे. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या मदतीला आठ खासगी रुग्णालये पुढे आली आहेत. त्यांच्याकडे तपासणी व उपचाराची सुविधा उपलब्ध आहे. पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय आणि महापालिकेचे वायसीएम रुग्णालय यांच्यात तर सामंजस्य करार झाला आहे. त्यानुसार, वायसीएममध्ये केवळ आयसोलेशन कक्ष व क्वारंटाइन कक्ष आहे. तर वायसीएममधील सामान्य रुग्ण डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल केले आहेत. गेल्या आठ दिवसांत 58 रुग्ण तपासण्यात आले आहेत. त्यांच्या घशातील द्रवांचे नमुने एनआयव्हीकडे तपासण्यात आले आहेत. महापालिका रुग्णालयांत येऊ न शकणारे नागरिक खासगी रुग्णालयातील तपासणीसाठी प्राधान्य देत आहेत. 

रुग्णालयांचे संपर्क क्रमांक 
वायसीएम पिंपरी - 020-67332222 
भोसरी नवीन - 9552578731 
जिजामाता पिंपरी - 9850279238 
लोकमान्य निगडी - 9561584838 
लोकमान्य चिंचवड - 9823409908 
डीवाय पाटील पिंपरी - 9823307703 
बिर्ला थेरगाव - 9881123008 
ग्लोबल थेरगाव - 9890669565 
संत ज्ञानेश्‍वर, मोशी - 9889888309 
स्टर्लिंग, निगडी-प्राधिकरण - 9850933512 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: private hospitals to help municipal hospital