पुण्यात इंजिनीअरिंगच्या वेळापत्रकाबाबत अफवा; वाचा वास्तव

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 April 2020

विद्यापीठाने परीक्षा स्थगीत केल्या असल्या तरी आता इंजिनिअरींचे वेळपत्रक जाहीर झाल्याच्या वावड्या उठल्या आहेत. यावर विद्यापीठाने अद्याप कोणतेही वेळपत्रक जाहीर केलेले नाही, विद्यार्थ्यांनी विश्वास ठेऊ नये असे आवाहन प्र-कुलकुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी केले आहे. 

पुणे - विद्यापीठाने परीक्षा स्थगीत केल्या असल्या तरी आता इंजिनिअरींचे वेळपत्रक जाहीर झाल्याच्या वावड्या उठल्या आहेत. यावर विद्यापीठाने अद्याप कोणतेही वेळपत्रक जाहीर केलेले नाही, विद्यार्थ्यांनी विश्वास ठेऊ नये असे आवाहन प्र-कुलकुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी केले आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'कोरोना'मुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्व परीक्षा १४ एप्रिल पर्यंत स्थगीत केल्या आहेत. परीक्षा लांबल्याने पुढील काळात परीक्षा कशा घ्याव्यात याचे नियोजन विद्यापीठाने सुरू केले आहे. मात्र, परीक्षांसंदर्भात उठणाऱ्या अफवांमुळे गोंधळ निर्माण झाला आहे. बुधवारी विद्यापीठाकडे इंजिनीयरींगचे वेळपत्रक जाहीर केले आहे का याबद्दल विद्यार्थ्यांनी चौकशी सुरू केली. त्यामुळे विद्यापीठाने वेळीच सतर्क होऊन अशा प्रकारे कोणतेही वेळपत्रक जाहीर केले नसल्याचे सांगितले. 

डॉ. उमराणी म्हणाले, "इंजिनीयरींगचे वेळपत्रक जाहीर झाले का असे चौकशी करणारे फोन आले असता त्यांना विद्यापीठाने जाहीर केले नाही असे सांगण्यात आले. इंजिनीयरींगची रेग्युलर परीक्षा असो किंवा ब्यॅकलाॅग यासंदर्भात परीक्षा मंडळात निर्णय घेतला जाईल. त्यानंतर सर्वांना अधिकृत माहिती दिली जाईल. बाहेरच्या कोणत्याही माहितीवर विश्वास ठेऊ नये."

विद्यापीठाचे संकेतस्थळ तपासा
पुणे विद्यापीठाच्या  www.unipune.ac.in  या संकेतस्थळावर सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक, विद्यापीठाचे निर्णय अधिकृतपणे जाहीर केले जातात. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता विद्यार्थ्यांनी संकेतस्थळ तपासावे. त्यावरील माहितीच खरी समजावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune university entrance exam 2020 rumors know facts