धक्कादायक : ऑपरेशन झालेला व्यक्ती कोरोनाबाधित; हॉस्पिटलमधील 93 जण क्वारंटाइन

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 April 2020

३१ मार्चला कासेवाडी येथे झालेल्या अपघातात एका रिक्षा चालकाच्या पोटाला गंभीर दुखापत झाली. तातडीने त्या खासगी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. तेथील डॉक्टारांनी त्याच्यावर उपचार केले. पोटोतील जखम गंभीर असल्याने ऑपरेशन करण्यात आले  त्यानंतर पेशंटाला ताप, सर्दी,खोकला अशी लक्षणे आढळली.

पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये नुकतीच एका पेशंटचे ऑपरेशन करण्यात आले होते. तो पेशंट कोरोनाबाधित असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे त्या खासगी वैद्यकीय महवि्दयालयातील ४३ डॉक्टर आणि ५० वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी चिंचवड परिसरात कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत २१ पेशंट आढळले असून त्यापैकी १२ पेशंट बरे झाले आहेत.  त्यातच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

पुणेकरांनो चिंता करू नका; शहराला पुरेल इतका भाजीपाला उपलब्ध

३१ मार्चला कासेवाडी येथे झालेल्या अपघातात एका रिक्षा चालकाच्या पोटाला गंभीर दुखापत झाली. तातडीने त्या खासगी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. तेथील डॉक्टारांनी त्याच्यावर उपचार केले. पोटोतील जखम गंभीर असल्याने ऑपरेशन करण्यात आले  त्यानंतर पेशंटाला ताप, सर्दी,खोकला अशी लक्षणे आढळल्याने त्याच्या घशातील द्रव्य यशवंतराव स्मृती हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले तेव्हा त्यामध्ये हा पेशंटचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर संबधित डॉक्टर आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या ९३ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांचे रिपोर्ट आज येणार असल्याचे हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Quarantine 93 people at the hospital due to one patient who tested positive for corona after operation