Coronavirus : पुणेकरांना येथे करणार क्वारंटाइन; विभागीय आयुक्तांकडून पाहणी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 April 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या खासगी संस्था आणि कंपन्यांच्या माध्यमातून आयसोलेशन हॉस्पिटल व क्वारंटाइन सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. पुणे जिल्ह्यातील म्हाळुंगे भागातील म्हाडातर्फे बांधण्यात आलेल्या सदनिकाची क्वारंटाइन सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने डॉ. म्हैसेकर यांनी पाहणी केली.

पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या खासगी संस्था आणि कंपन्यांच्या माध्यमातून आयसोलेशन हॉस्पिटल व क्वारंटाइन सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. पुणे जिल्ह्यातील म्हाळुंगे भागातील म्हाडातर्फे बांधण्यात आलेल्या सदनिकाची क्वारंटाइन सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने डॉ. म्हैसेकर यांनी पाहणी केली. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या वेळी पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, खेडचे प्रांतधिकारी संजय तेली, जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार, सिम्बायोसिस हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय नटराजन, वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन जाधव उपस्थित होते.

डॉ. म्हैसेकर यांनी सिम्बायोसिस रुग्णालयातील प्रमुख डॉक्टरांशी चर्चा करुन तेथील आयसोलेशन व क्वारंटाइन सुविधाबाबत पाहणी केली. पुणे जिल्ह्यात कोरोनो विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून आयसीयु व आयसोलेशन बेडची तयारी करण्यात येत आहे. त्यादृष्टीने सिम्बायोसिस रुग्णालयात आयसोलेशन बेडची सोय करण्यात येणार आहे.  तसेच काही खासगी कंपन्यानीही क्वारंटाइन सुविधेसाठी पुढाकार घेतला आहे. त्यादृष्टीकने काही खासगी कंपन्यांच्या सुविधेचे पाहणी करण्यात येत असल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Quarantine facilities available in mahalunge mhada home for pune citizens