आंदर व नाणे मावळ भागातील शाळेतील शिल्लक तांदूळ पालकांना वाटप करण्यास सुरवात

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 April 2020

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून शासनाने मावळ तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील सर्व जिल्हा परिषद शाळा गेल्या एक महिन्यापासून बंद ठेवल्या आहे. शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी पोषण आहारापासून वंचीत राहत आहे. याचा विचार करुन महाराष्ट्र शासनाने शाळा स्तरावरील सर्व शिल्लक तांदूळ, डाळी ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थ्यांना व पालकांना वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

टाकवे बुद्रुक - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून शासनाने मावळ तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील सर्व जिल्हा परिषद शाळा गेल्या एक महिन्यापासून बंद ठेवल्या आहे. शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी पोषण आहारापासून वंचीत राहत आहे. याचा विचार करुन महाराष्ट्र शासनाने शाळा स्तरावरील सर्व शिल्लक तांदूळ, डाळी ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थ्यांना व पालकांना वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मागील एक महीन्यापासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजने अंतर्गत शाळेंमध्ये असलेले धान्य पडून असल्याने ते खराब होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन चा पहिला टप्पा संपून दुसरा टप्पा सुरू झाला आहे. हा लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढल्याने शासनाच्या आदेशानुसार, हे सर्व धान्य विद्यार्थ्यांना वाटप करण्यास सुरवात केली आहे.

शासनाच्या सूचनेनुसार, विद्यार्थ्यांना हे धान्य वाटप ठरलेल्या वेळेतच होणार असल्याने पालकांनी वेळेत उपस्थित राहावे, असे शालेय व्यवस्थापन समितीकडून सांगण्यात आले आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने तांदूळ वाटप सोशल डिस्टन्सिंग व विशेष काळजी घेऊन वाटप होत असल्याचे शाळांच्या मुख्याध्यापकांनी सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rice distribution in aandar and nane maval