esakal | Video : भंगार गोळा करणाऱ्यांचा थांबला जीवन गाडा
sakal

बोलून बातमी शोधा

Sukhdev-and-Panchfula

'दररोज आम्ही रस्त्यावर, कचराकुंड्यातून भंगार गोळा करतो. ते विकल्यानंतर आम्हांला चार पैसे मिळतात. त्यावर उपजीविका भागते. मात्र, सध्या भंगाराची दुकानंच बंद असल्याने आम्ही गोळा केलेला भंगारमाल आमच्याकडेच पडून आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणेही कठीण झाले आहे, अशी करुण कहाणी आहे भंगारातून भूक भागविणाऱ्या सुखदेव व पंचफुला गायकवाड या दांपत्यांची.

Video : भंगार गोळा करणाऱ्यांचा थांबला जीवन गाडा

sakal_logo
By
सुवर्णा नवले

पिंपरी - 'दररोज आम्ही रस्त्यावर, कचराकुंड्यातून भंगार गोळा करतो. ते विकल्यानंतर आम्हांला चार पैसे मिळतात. त्यावर उपजीविका भागते. मात्र, सध्या भंगाराची दुकानंच बंद असल्याने आम्ही गोळा केलेला भंगारमाल आमच्याकडेच पडून आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणेही कठीण झाले आहे, अशी करुण कहाणी आहे भंगारातून भूक भागविणाऱ्या सुखदेव व पंचफुला गायकवाड या दांपत्यांची.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपळे गुरव येथील राजीव गांधी झोपडपट्टीत ते राहतात. पंचफुला यांना स्वत:ची व्यथा सांगताना अश्रू अनावर झाले. त्या म्हणाल्या, 'आमचे हातावरचे पोट आहे. पदरी चार मुली आणि एक मुलगा आहे. रोज खाण्याची आबाळ होतेय. रस्त्यावर येणारी-जाणारी चार माणसं खायला देतात. तेव्हा कुठं खायला मिळतं. त्यासाठी दिवसभर रस्त्यावरच बसून दिवस काढावा लागतो. हा आमचा नित्याचा क्रम झाला आहे.'

पिंपरी-चिंचवड शहरात भंगार व्यावसायिक मोठ्या प्रमाणात आहेत. चिखली, कुदळवाडी या भागात हा व्यवसाय मोठ्या चालतो. हातगाड्यांवर भंगार जमा करून विकणाऱ्यांची संख्याही शेकडो आहे. शहरातील गल्लीबोळात हा व्यवसाय थाटून बसलेले लोक दिसतात. त्यामुळे भंगार व्यावसायिकांचे जिणेही अवघड झाले आहे. सध्या लॉकडाउन संपण्याकडे या सर्वांचे डोळे लागले आहेत.

हा नित्याचा दिनक्रम थांबला....
दिवस उजाडला की भंगार गोळा करणाऱ्यांच्या हाताला काम मिळते. भंगारातून पुठ्ठा, काच, प्लास्टिक, लोखंडाचे विलगीकरण करून त्यांना दिवसाकाठी दोनशे ते तीनशे रुपये मिळतात. चार ते दहा रुपये भंगाराचे दर आहेत. लॉकडाउन संपल्यानंतरही या दुकानांना परवानगी मिळणार की नाही हा प्रश्‍न अनुत्तरीत आहे? तोपर्यंत भंगारातून उदरनिर्वाह कसा करावयाचा हा प्रश्‍न सर्व व्यावसायिकांना सतावत आहे.

loading image
go to top