पुणेकर नागरिकांच्या मदतीसाठी ७ आयएएस अधिकारी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 मार्च 2020

लॉकडाऊनच्या काळात पुणेकरांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आता सात वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी गुरुवारी (ता. २६) या अधिकाऱ्यांची समन्वयक अधिकारी (नोडल ऑफिसर ) म्हणून नेमणूक केली आहे. या सर्वांवर प्रत्येकी एका विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

पुणे - लॉकडाऊनच्या काळात पुणेकरांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आता सात वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी गुरुवारी (ता. २६) या अधिकाऱ्यांची समन्वयक अधिकारी (नोडल ऑफिसर ) म्हणून नेमणूक केली आहे. या सर्वांवर प्रत्येकी एका विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप                            

यामध्ये पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त एस. पी. सिंग यांच्याकडे रुग्णालय व्यवस्थापन आणि गंभीर रुग्णांची काळजी घेणे,  पुणे महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे विलगीकरण कक्ष, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्याकडे विलगीकरण कक्ष सुविधा, कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्याकडे जीवनावश्यक वस्तू पुरवठा व सेवा विभाग, सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्याकडे औषध पुरवठा विभाग, महिला व बालकल्याण विभागाचे आयुक्त हर्षवर्धन यशोद यांच्याकडे स्वस्त धान्य दुकानांमधून केला जाणारा अन्नधान्य पुरवठा आणि पीएमपीच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे  यांच्याकडे  वाहतूक विभागाच्या समन्वयकाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: seven ias officer for pune people help