#Lockdown2.0 : लाॅकडाऊनमुळे मावळातील लग्न साध्या पद्धतीने

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 April 2020

देशात सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे लग्न समारंभ कार्यावर विपरीत परिणाम झाला आहे. अशा या परिस्थितीत अनेक जोडप्यांनी आपापल्या विवाह तारखा पुढे ढकलल्या आहेत तर काही जोडप्यांनी नाइलाजास्तव लग्न नवरीच्या घरी किंवा मंदीरात साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे.

टाकवे बुद्रुक - देशात सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे लग्न समारंभ कार्यावर विपरीत परिणाम झाला आहे. अशा या परिस्थितीत अनेक जोडप्यांनी आपापल्या विवाह तारखा पुढे ढकलल्या आहेत तर काही जोडप्यांनी नाइलाजास्तव लग्न नवरीच्या घरी किंवा मंदीरात साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे.

 बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मावळ भागात दिवाळीनंतर साखरपुडे व लग्नसराई सुरु होते. लाॅकडाऊन च्या पहिल्या टप्प्यात बर्यापैकी साखरपुडे झाले. अनेक जोडप्यांनी ब्राह्मणांकडून काढलेल्या तिथीनूसार मार्च व एप्रिल महीन्यातील तारखा विवाहास निवडल्या होत्या. त्याप्रमाणे लग्न समारंभासाठी कार्यालयांच्या नोंदण्याही केल्या होत्या. मात्र, २३ मार्चनंतर करण्यात आलेल्या लाॅकडाऊन च्या पहिल्या टप्प्यात या जोडप्यांवर संचारबंदीचे संकट आोढवले गेले. १४ एप्रिल नंतर लाॅकडाऊन उघडेल अशी आशा होती. परंतू शासनाने लाॅकडाऊन चा दुसरा टप्पा ही ता.३ मे पर्यंत वाढवला. कार्यालयात होणारे लग्नसमांरभ रद्द करण्यास शासनाने आदेश दिले.

त्यामुळे मावळात एप्रिल महीन्यात थाटामाटात कार्यालयात होणारी लग्ने आता साध्या पद्धतीने नवरीच्या घरात व मंदीरात होत आहेत. लग्नास पुढे तारखा ढकललेल्या जोडप्यांसाठी मे व जून महीन्यात लग्न कार्यालयात करण्यास शासन परवानगी देतील की नाही? याची मात्र शक्यता वाटत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: simple wedding in Maval by lockdown