Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 April 2020

सरकारी यंत्रणांकडून कोणत्याही ठिकाणी गर्दी करू नका, तसेच दोन व्यक्‍तींमध्ये तीन फुटांचे अंतर ठेवण्याच्या सूचना वारंवार करण्यात येत आहेत. मात्र, नागरिक त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. परिणामी संसर्ग वाढण्याची शक्‍यता आहे. चिंचवड चौकातील पेट्रोल पंपावर वाहनचालकांनी गर्दी केली होती. दोन वाहनांमध्ये पुरेसे अंतर न ठेवता एका मागोमाग उभी केली होती. पंपावरील कर्मचाऱ्यांकडून अंतर राखण्याचे सांगण्यात आले, तरीही वाहनचालक त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होते. अशीच परिस्थिती शहरात अन्य पंपावर पाहायला मिळाली.

पिंपरी - दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना बँका व पेट्रोल पंपांवर नागरिकांडून सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजत आहेत.  

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सरकारी यंत्रणांकडून कोणत्याही ठिकाणी गर्दी करू नका, तसेच दोन व्यक्‍तींमध्ये तीन फुटांचे अंतर ठेवण्याच्या सूचना वारंवार करण्यात येत आहेत. मात्र, नागरिक त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. परिणामी संसर्ग वाढण्याची शक्‍यता आहे. चिंचवड चौकातील पेट्रोल पंपावर वाहनचालकांनी गर्दी केली होती. दोन वाहनांमध्ये पुरेसे अंतर न ठेवता एका मागोमाग उभी केली होती. पंपावरील कर्मचाऱ्यांकडून अंतर राखण्याचे सांगण्यात आले, तरीही वाहनचालक त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होते. अशीच परिस्थिती शहरात अन्य पंपावर पाहायला मिळाली. 

मोरवाडी चौकातील एका राष्ट्रीयकृत बॅंकेच्या एटीएम बाहेर उभ्या असलेल्या नागरिकांमध्येही अंतर नव्हते. यावरून नागरिकांमध्ये सोशल डिस्टन्सिंगबाबत गांभीर्य नसल्याचे दिसून आले.

दरम्यान, पेट्रोल पंप, बॅंका, किराणा दुकान व भाजी मंडई याठिकाणी गर्दी करू नका, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे. तसेच, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षित अंतर राखण्याचे पोलिसही सांगत आहेत. परंतु, नागरिकच जुमानत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: social distancing issue in pimpri chinchwad